कार मायलेजसाठी कसे वापराल एसी (फोटो सौजन्य - iStock)
कारमध्ये बसल्यानंतर सर्वात पहिले जर आपण काय करत असू तर एसी चालू करतो. एसीशिवाय कार चालवणं अथवा एसीशिवाय कारमध्ये बसणं आता शक्यच नाहीये. मुंबईत तर हल्ली इतका उन्हाळा असतो अथवा घामाच्या धारा लागलेल्या असतात की एसीशिवाय प्रवास करणे शक्यच नाही मग अशावेळी कारचे मायलेज कमी होते. एसी पूर्ण वेळ चालवल्यानंतरही आपण मायलेज डबल राखू शकतो. तुम्हालाही हे वाचून आश्चर्य वाटलं ना? जाणून घ्या कसे?
जर उन्हाळ्यात एअर कंडिशनर चालवल्यामुळे गाडी चालवणे महागडे ठरत असेल, तर आता तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. खरंतर आज आम्ही या समस्येवर एक उपाय घेऊन आलो आहोत, जो अवलंबल्यानंतर तुम्हाला पुन्हा कधीही गाडीत जास्त इंधन भरण्याची गरज पडणार नाही. एवढेच नाही तर तुमची गाडी उत्तम मायलेज देईल. अनेकदा कारमध्ये एसी चालविण्याची पद्धत अनेकांना माहीत नसते. यासाठी नक्की सोपे उपाय कोणते करता येतील आणि कशा पद्धतीने तुम्ही हे मायलेज डबल करू शकता याबाबत जाणून घेऊया
खिडकी उघडा
गाडी चालवताना, सर्वप्रथम पहिल्यांदा तुम्ही एअर कंडिशनर चालू करा, त्यानंतर, काही वेळ एअर कंडिशनर त्याच वेगाने चालवल्यानंतर, तो बंद करावा. गाडी थंड ठेवण्यासाठी, गाडीच्या खिडक्या थोड्या खाली कराव्यात जेणेकरून गाडीत हवेचे वेंटिलेशन राहील आणि एअर कंडिशनरशिवायही उन्हाळ्यात तुमच्या गाडीचे केबिन थंड राहते. तुम्ही हे नक्की करून पाहा तुम्हाला योग्य आणि चांगला फरक दिसून येईल
Tata ने केली 2 लाख इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री! रेकॉर्डब्रेक विक्रीदरम्यान दिली मोठी ऑफर
कारमध्ये बसताना करा काम
जेव्हा तुम्ही तुमची गाडी तुमच्या घराबाहेर किंवा ऑफिसबाहेर पार्क करता तेव्हा उन्हाळ्याच्या दिवसात गाडीचे केबिन खूप गरम होणे साहजिक आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमची गाडी घेऊन लगेच निघून गेलात तर तुम्हाला गाडी चालवण्यात खूप अडचण येऊ शकते. जर तुम्हाला असे होऊ नये असे वाटत असेल, तर तुम्ही गाडीत बसण्यापूर्वी ५ ते १० मिनिटे त्याचे दरवाजे उघडले पाहिजेत, असे केल्याने आत असलेली उष्णता पूर्णपणे निघून जाते आणि गाडी चालवताना तुम्हाला एअर कंडिशनर पूर्ण वेगाने चालू ठेवावे लागत नाही.
कारशेडचा करा वापर
तुम्हाला एअर कंडिशनर पूर्ण वेगाने चालवण्याची गरज पडू नये म्हणून, तुम्ही कार शेड्स वापरावे जेणेकरून कारचे केबिन गरम होणार नाही. यानंतर तुम्हाला एअर कंडिशनर जास्त वेगाने चालवण्याची गरज नाही. जर तुम्ही मारुती सुझुकी वॅगन आर सीएनजी चालवत असाल तर तुम्हाला प्रति किलोग्रॅम अंदाजे ३५ किलोमीटर मायलेज मिळते. जर तुम्ही अशा प्रकारे एअर कंडिशनर वापरला आणि गाडी इकॉनॉमी मोडमध्ये ठेवली तर तुम्हाला प्रति किलोग्रॅम अंदाजे ४० किमी मायलेज मिळेल.
2025 मध्ये Renault ने ‘या’ 2 कार केल्या अपडेट, किंमतीत सुद्धा केले बदल? जाणून घ्या