टाटा इलेक्ट्रिक कार्ससाठी खास ऑफर
प्रत्येकाला आपल्याकडे कार असावी असे वाटते आणि घराघरात कार असावी हे स्वप्नं नेहमीच टाटा कंपनीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. आता इलेक्ट्रिक मोटर्समध्येही वाढ झाली असून टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत एक मोठा टप्पा गाठला आहे. टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत दोन लाख युनिट्सचा आकडा ओलांडला आहे. या निमित्ताने, टाटा कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे, जी पुढील ४५ दिवस सुरू राहील. कशी आहे ही खास ऑफर आणि तुम्हाला याचा कसा फायदा घेता येईल याबाबत अधिक माहिती घेऊया
टाटा ईव्हीवर खास ऑफर
टाटा कंपनीने त्यांच्या सर्व इलेक्ट्रिक कारवर एक खास ऑफर आणली आहे. टाटाच्या या ऑफरमध्ये एक्सचेंज बोनस आणि १००% ऑन-रोड फायनान्स पर्याय समाविष्ट आहे. यासोबतच, कंपनीने टाटा पॉवर चार्जिंग स्टेशनवरून मोफत चार्जिंगच्या फायद्याची मर्यादाही सहा महिन्यांनी वाढवली आहे. कंपनी इलेक्ट्रिक कार खरेदीवर ७.२ किलोवॅट एसी फास्ट होम चार्जरची मोफत स्थापनादेखील देत आहे. तुम्ही वेळीच याबाबत अधिक माहिती घेऊन ही ऑफर मिळवावी
Hyundai च्या कार खरेदी करण्यासाठी महत्वाची बातमी, कंपनीची ‘ही’ कार झाली महाग
टाटा देत आहे लॉयल्टी बोनस
टाटाने आपल्या ग्राहकांसाठी लॉयल्टी बोनस देखील आणला आहे. ही ऑफर त्यांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे आधीच या ब्रँडची कार आहे. ज्या टाटा ग्राहकांकडे आधीच इलेक्ट्रिक कार आहे, त्यांनी नवीन नेक्सॉन ईव्ही किंवा कर्व्ह ईव्ही खरेदी केल्यास त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत लॉयल्टी बोनस दिला जात आहे. तर, ज्या ग्राहकांना ICE प्रकार आहेत त्यांना २०,००० रुपयांपर्यंतचा लॉयल्टी बोनस दिला जात आहे.
टाटाच्या नवीन इलेक्ट्रिक कार
टाटा मोटर्स ही भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची सर्वात मोठी श्रेणी असलेली कंपनी आहे. टाटाने अलीकडेच इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये हॅरियर ईव्ही आणि सिएरा ईव्ही सादर केले. टाटाच्या या दोन्ही नवीन इलेक्ट्रिक कार या वर्षाच्या अखेरीस बाजारात लाँच केल्या जाऊ शकतात.
Tesla च्या कारला महिंद्रा कशी देणार धोबीपछाड? Anand Mahindra यांनी सांगितला मास्टर प्लॅन
टाटा इलेक्टिक कार्सच्या किंमती
टाटा इलेक्ट्रिक कारच्या किमती खालीलप्रमाणे आहेत: