फोटो सौजन्य: @ashwinsatyadev (X.com)
भारतीय बाजरात आजचा ग्राहक फक्त कारच्या किंमतीकडेच नाही तर त्याच्या परफॉर्मन्सकडे सुद्धा कटाक्षाने पाहतो. म्हणूनच तर अनेक कंपन्या एखादी कार लाँच केल्यानंतर देखील त्याचे अपडेटेड व्हर्जन मार्केटमध्ये आणत असतात. जेणेकरून ग्राहकांना अधिक चांगला अनुभव मिळेल.
रेनॉल्ट कंपनीने मार्केटमध्ये अनेक उत्तम कार लाँच केल्या आहेत. ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार कंपनी मार्केटमध्ये कार ऑफर करत असते. फ्रेंच वाहन निर्माता कंपनी रेनॉल्ट भारतीय बाजारात तीन कार सादर करते. यापैकी दोन कार कंपनीने अपडेट केल्या आहेत. रेनॉल्टने कोणत्या कार अपडेट केल्या आहेत? यामध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स दिली आहेत? दोन्ही कार किती किमतीत खरेदी करता येतील? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
टोयोटा EV सेगमेंटमध्ये 7 Seater MPV आणायच्या तयारीत, पण भारतात होणार का लाँच?
रेनॉल्टने Renault Triber अपडेट केली आहे, जी बजेट एमपीव्ही म्हणून दिली जाते आणि Renault Kiger, जी Sub Four Meter SUV म्हणून आणली जाते. दोन्ही कारच्या 2025 व्हर्जन्स फेब्रुवारी 2025 मध्ये लाँच करण्यात आल्या आहेत.
कंपनीने 2025 च्या रेनॉल्ट किगर आणि ट्रायबरमध्ये काही फीचर्स स्टॅंडर्ड म्हणून समाविष्ट केली आहेत. ज्यामध्ये चारही पॉवर विंडो, रिमोट सेंट्रल लॉक समाविष्ट आहे. यासोबतच, RXL व्हेरियंटमध्ये आठ इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम, अॅपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, रियर व्ह्यू कॅमेरा आणि स्टीअरिंग माउंटेड कंट्रोल्स देखील देण्यात आले आहेत. RXZ व्हेरियंटमध्ये स्मार्ट कार्ड अॅक्सेस आणि रिमोट इंजिन स्टार्ट सारखी फीचर्स देखील जोडण्यात आली आहेत. तर RXT व्हेरियंटमध्ये 15-इंच फ्लेक्स व्हील्स देण्यात आले आहेत.
एलोन मस्क आणि पंतप्रधान मोदींची भेट, आता Tesla च्या ‘या’ कार भारतात एंट्री मारण्यास सज्ज?
रेनॉल्टने किगर एसयूव्हीच्या RXT (O) व्हेरियंटमध्ये टर्बो पेट्रोल इंजिनसह CVT ट्रान्समिशनचा पर्याय देखील दिला आहे. यासह, आता कंपनीने ऑफर केलेल्या तिन्ही कार E-20 शी सुसंगत बनवल्या आहेत.
रेनॉल्ट ही किगर एसयूव्ही 6.10 लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीत देत आहे. त्याचा टॉप व्हेरियंट 10.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करता येईल.
रेनॉल्ट किगर ही सब फोर मीटर एसयूव्ही म्हणून आणली आहे. ती निसान मॅग्नाइट, टाटा पंच, मारुती ब्रीझा, ह्युंदाई व्हेन्यू, किआ सोनेट, किआ सायरोस, महिंद्रा XUV 3XO सारख्या SUV शी थेट स्पर्धा करते.
त्याच वेळी, रेनॉल्ट ट्रायबर ही देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर एमपीव्ही म्हणून ऑफर केली जाते. ही कार मारुती एर्टिगा, किआ कॅरेन्स सारख्या एमपीव्हीशी थेट स्पर्धा करते.