सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : भारतात वेईकल सुरक्षिततेला प्रगत करण्याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करत किया इंडियाने आज मोठी घोषणा केली आहे. ऑल-न्यू किया सेल्टोसने भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (बीएनसीएपी) अंतर्गत ५-स्टार सेफ्टी रेटिंग संपादित केले आहे, जेथे बीएनसीएपी अंतर्गत चाचणी करण्यात आलेल्या आयसीई वेईकल्समध्ये सर्वाधिक अडल्ट ऑक्यूपण्ट प्रोटेक्शन स्कोअर, तसेच उत्तम चाइल्ड ऑक्यूपण्ट प्रोटेक्शन स्कोअर संपादित केला आहे, जो आतापर्यंतचा सर्वोच्च आहे. ऑल-न्यू सेल्टोस सर्वाधिक स्कोअर मिळवलेली आयसीई वेईकल ठरली आहे.
या टप्प्याने ऑटोमोटिव्ह सुरक्षिततेमध्ये नवीन मापदंड स्थापित केला आहे, ज्यामुळे सेल्टोस भारतातील अधिकृत क्रॅश टेस्ट प्रोग्राम अंतर्गत आयसीई वेईकल सुरक्षिततेसाठी आदर्श मानक बनली आहे. एका विशेष सोहळ्यात किया इंडियाला हे प्रमाणपत्र औपचारिकरित्या प्रदान करण्यात आले, जेथे माननीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री (एमओआरटीएच) नितीन गडकरी यांच्या हस्ते बीएनसीएपी प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले.
या महत्त्वपूर्ण टप्प्याबाबत मत व्यक्त करत किया इंडियाचे एमडी व सीईओ ग्वांगू ली म्हणाले, “कियाच्या उत्पादन तत्त्वामध्ये सुरक्षिततेला अधिक प्राधान्य दिले जाते. आम्ही भारतातील सर्वात विश्वसनीय गतीशीलता ब्रँड बनण्याच्या दिशेने आमचा प्रवास सुरू ठेवला आहे. ऑल-न्यू किया सेल्टोसने ५-स्टार रेटिंगसह बीएनसीएपी अंतर्गत चाचणी करण्यात आलेल्या आयसीई वेईकल्समध्ये सर्वोच्च अडल्ट ऑक्यूपण्ट प्रोटेक्शन स्कोअर, तसेच आतापर्यंत नोंदणी करण्यात आलेला उत्तम चाइल्ड ऑक्यूपण्ट प्रोटेक्शन स्कोअर संपादित केला आहे, ज्यासह बीएनसीएपी अंतर्गत सर्वाधिक स्कोअर मिळालेली आयसीई वेईकल ठरली आहे. यामधून आमच्या अभियांत्रिकी क्षमता आणि उद्देश मुख्यत्वे दिसून येतात, जेथे संरचनेपासून प्रगत सुरक्षितता तंत्रज्ञानांपर्यंत वेईकलचा प्रत्येक पैलू प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात डिझाइन करण्यात आला आहे, ज्यामुळे ही वेईकल फॅमिली एसयूव्ही म्हणून प्रमुख निवड ठरली आहे. या टप्प्याने सुरक्षिततेसाठी नवीन मापदंड स्थापित केले आहेत आणि त्यामधून भारतातील ग्राहकांसाठी जागतिक स्तरावरील सुरक्षितता मानक आणण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.”
भारत एनसीएपी मूल्यांकनादरम्यान ऑल-न्यू किया सेल्टोसने क्रॅश स्थितींमध्ये उत्तम कार्यक्षमता दाखवली, जेथे अडल्ट ऑक्यूपण्ट प्रोटेक्शनसाठी ३१.७० पॉइण्ट्स संपादित केले, जे आतापर्यंत चाचणी करण्यात आलेल्या आयसीई वेईकल्समध्ये सर्वाधिक आहेत आणि चाइल्ड ऑक्यूपण्ट प्रोटेक्शनसाठी ४५.०० पॉइण्ट्स संपादित केले, जो आतापर्यंतचा सर्वाधिक नोंद करण्यात आलेला स्कोअर आहे. ज्यामुळे एकत्रित स्कोअर ७६.७० पॉइण्ट्सपर्यंत पोहोचला, जो बीएनसीएपी अंतर्गत चाचणी करण्यात आलेल्या आयसीई वेईकल्समध्ये सर्वाधिक आहे. यासह प्रवाशांच्या सर्वसमावेशक सुरक्षिततेवरील ब्रँडचा फोकस अधिक दृढ झाला आहे. या निकालामधून नवीन के३ प्लॅटफॉर्मची अभियांत्रिकी क्षमता दिसून येते. हा प्लॅटफॉर्म एसयूव्हीचा प्रबळ पाया आहे. संरचनात्मक दृढता आणि सुधारित क्रॅश एनर्जी व्यवस्थापनासाठी डिझाइन करण्यात आलेल्या या प्लॅटफॉर्ममध्ये शक्तिशाली हॉट-स्टॅम्प कम्पोनण्ट्स आणि उच्च क्षमतेचे स्टील आहे, जे अपघातादरम्यान आघाताचा प्रभाव सहन करण्यासह विभागतात.
ऑल-न्यू किया सेल्टोसमध्ये भारतासाठी डिझाइन केलेली सर्वसमावेशक सुरक्षा प्रणाली असून २४ स्टँडर्ड फीचर्स, ६ एअरबॅग्स आणि एडीएएस लेव्हल २सह प्रगत तंत्रज्ञान दिले आहे. ५-स्टार बीएनसीएपी रेटिंग मिळवणारी ही दुसरी किया कार ठरली असून, सेल्टोसची लोकप्रियता आणि ग्राहकांचा विश्वास अधिक मजबूत झाला आहे.
हे सुद्धा वाचा : मार्चमध्ये 28% विक्री करत TATA ठरले ‘Dhurandhar’, कोणत्या गाडीला किती मिळाले ग्राहक






