
संयुक्त उपक्रम असलेली AM/NS इंडिया यांनी ‘झॅग्नेलिस प्रोटेक्ट’ या प्रीमियम कोटेड ऑटोमोटिव्ह स्टीलची निर्मिती भारतात सुरू केली आहे. युरोपबाहेर या उत्पादनाचे स्थानिकीकरण होणारी भारत ही पहिलीच बाजारपेठ ठरली आहे. यामुळे देशातील उच्च-तंत्रज्ञान स्टीलच्या आयातीवरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होईल.
भारतात निर्माण होणाऱ्या गाड्यांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या ऑटोमोटिव्ह स्टीलपैकी सुमारे ८ ते १० टक्के भाग तंत्रज्ञानाच्या गुंतागुंतीमुळे आत्तापर्यंत आयात करावा लागत होता. देशात दरवर्षी ३ कोटींपेक्षा जास्त वाहनांचे उत्पादन होते. त्यामुळे अशा उच्च दर्जाच्या स्टीलची निर्मिती भारतातच होणे ही धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
‘झॅग्नेलिस प्रोटेक्ट‘चे प्रमुख फायदे,
AM/NS इंडियाचे मार्केटिंग डायरेक्टर रंजन धर यांनी स्पष्ट केले की, प्रगत स्टील तंत्रज्ञानाच्या मदतीने आयात पर्याय निर्माण करण्याच्या त्यांच्या धोरणाचा हा एक भाग आहे. रिन्यूएबल एनर्जीसाठी ‘मॅग्नेलिस’ आणि बांधकामासाठी ‘ऑप्टिगल’ नंतर आर्सेलरमित्तलने भारतात व्यावसायिक स्तरावर आणलेले हे तिसरे पेटंट आहे.
मोठी बातमी! नवी मुंबईत वाहनांसाठी MH-43-CW ही नवीन नोंदणी मालिका सुरू
गुजरात येथील प्लँटच्या मोठ्या विस्तारीकरण कार्यक्रमांतर्गत हे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. AM/NS इंडियाची सध्याची स्टील उत्पादन क्षमता वार्षिक ९ दशलक्ष टन आहे. याशिवाय, कंपनी आंध्र प्रदेशात ८.२ दशलक्ष टन क्षमतेचा नवीन एकात्मिक स्टील प्रकल्प उभारणीच्या कामात आहे.
GMK सेंटरच्या अहवालानुसार, ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष २०२५/२०२६ मध्ये भारताची रोल-स्टील निर्यात ३६% ने वाढून ६.६ दशलक्ष टनांवर पोहोचली आहे. युरोपमधील आगामी व्यापार धोरणातील बदलांपूर्वी झालेल्या मोठ्या खरेदीमुळे या निर्यातीत ही वाढ झाली आहे.