ऑडीकडून ‘या’ लक्झरी कारचे बुकिंग सुरू; जाणून घ्या फीचर्स आणि कलर ऑप्शन
Audi RS Q8 Performance Bookings: भारतीय बाजारपेठेत अनेक प्रकारच्या कार उपलब्ध आहेत, जर तुम्ही किफायतशीर आणि चांगले मायलेज देणारी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी अनेक ऑप्शन्स तुमच्यासमोर उपलब्ध आहेत. जसे की , ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात नवीन ऑडी आरएस क्यू८ परफॉर्मन्ससाठी बुकिंगला सुरूवात केली. ही एसयूव्ही ऑडी इंडिया वेबसाइट किंवा ‘मायऑडी कनेक्ट’ अॅप्लीकेशनच्या माध्यमातून ५,००,००० रूपयांच्या प्रारंभिक बुकिंग रकमेसह बुक करता येऊ शकते.
६४० एचपी शक्ती आणि ८५० एनएम टॉर्कची निर्मिती करणारे शक्तिशाली ४.० लीटर व्ही८ टीएफएसआय इंजिन असलेली नवीन ऑडी आरएस क्यू८ परफॉर्मन्स फक्त ३.६ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्त करू शकते आणि ऑप्शनल पॅकेजसह अव्वल गती ३०५ किमी/तास आहे.
आता ‘या’ कंपनीच्या बाईक दिसणार चौका-चौकात, मोठ्या शहरांमध्ये उघडले अजून 10 शोरूम
ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, “नवीन ऑडी आरएस क्यू८ सर्वोत्तम परफॉर्मन्सची एसयूव्ही रचना आहे, जिच्यामध्ये अविश्वसनीय शक्ती आणि दैनंदिन उपयुक्ततेचे एकत्रिकरण आहे. या एसयूव्हीचा विशिष्ट लुक आणि सर्वोत्तम ड्रायव्हिंग विशिष्टता लक्झरी व उत्साहवर्धक ड्रायव्हिंग अनुभवाचा शोध घेणारा परफॉर्मन्स चाहत्यांच्या नवीन पिढीचे लक्ष वेधून घेतात. सुधारित वैशिष्ट्ये आणि सर्वात शक्तिशाली इंजिनसह नवीन ऑडी आरएस क्यू८ परफॉर्मन्स अद्वितीय ड्रायव्हिंग अनुभव देते, जे सूक्ष्मदर्शी ग्राहक ऑडी आरएस श्रेणी उत्पादनाकडून मागणी करत आहेत. आम्हाला सांगताना आनंद होत आहे की, बुकिंग्जना आता सुरूवात झाली आहे, ज्यामुळे स्पोर्ट्स कारप्रेमींनी लवकरात लवकर कार बुक करा, कारण ही कार मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे.”
ग्राहक ऑडी इंडिया वेबसाइट (www.audi.in) आणि ‘मायऑडी कनेक्ट’ अॅपद्वारे ऑनलाइन बुकिंग्जच्या माध्यमातून ऑडी आरएस क्यू८ बुक करू शकतात.
ग्राहक ५ लाख रुपयांपर्यंत बुकिंग रक्कम देऊन ही एसयूव्ही बुक करू शकतात. ऑडी आरएस क्यू८ खरेदी करू इच्छिणारे ग्राहक ऑडी इंडियाच्या वेबसाइट (www.audi.in) ला भेट देऊन ती बुक करू शकतात. याशिवाय, ग्राहक ‘मायऑडी कनेक्ट’ अॅपद्वारे ते ऑनलाइन बुक करू शकतात.
२०२५ ऑडी आरएस क्यू८ मध्ये मिळणारे अपग्रेड लक्षात घेता, त्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे २ कोटी रुपये असण्याची अपेक्षा आहे. लाँच झाल्यावर, RS Q8 परफॉर्मन्स लॅम्बोर्गिनी उरुस एस आणि पोर्श केयेन जीटीएस सारख्या उच्च-कार्यक्षमता असलेल्या एसयूव्हींना स्पर्धा करेल.