फोटो सौजन्य: Social Media
देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातही आता इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर सुद्धा भारतीय रस्त्यांवर धावताना दिसत आहे. ग्राहक सुद्धा या इलेक्ट्रिक दुचाकींना चांगला प्रतिसाद देत आहे. मार्केटमध्ये अशा अनेक ई-बाईक उत्पादक कंपन्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे ओबेन इलेक्ट्रिक.
७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, ओबेन इलेक्ट्रिक देशभरातील प्रमुख ठिकाणी 10 नवीन शोरूम आणि सेवा केंद्रे सुरू केली आहेत. या नवीन केंद्रांच्या लाँचसह, ओबेन आता ७ राज्ये आणि 14 शहरांमध्ये 22 शोरूम आणि सेवा केंद्रांसह 53 दशलक्ष भारतीयांपर्यंत पोहोचले आहे.
पुण्यातील शिवाजीनगर आणि धनकवडी, कर्नाटकातील हुबळी, केरळमधील मलप्पुरम आणि त्रिशूर, छत्तीसगडमधील बिलासपूर, उत्तर प्रदेशातील लखनऊ, मैनपुरी, बदायूं आणि नवी दिल्लीतील आदिचिनी येथे नवीन शोरूम उघडण्यात आल्या आहेत. या विस्तारामुळे ओबेन उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडसारख्या नवीन ईव्ही बाजारपेठांमध्ये प्रवेश करत आहे आणि त्याचबरोबर कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्रातही त्यांची उपस्थिती मजबूत करत आहे.
100 नवीन शोरूम आणि सर्व्हिस सेंटर उघडण्याच्या ओबेन इलेक्ट्रिकच्या योजनेला ‘सिरीज ए फंडिंग राउंड’मधून मोठे यश मिळाले आहे. आता कंपनी या यशावर भर देण्याच्या आणि भारतातील प्रमुख आणि मोठ्या ईव्ही बाजारपेठांमध्ये आपली पकड मजबूत करण्याच्या मोहिमेवर आहे. कंपनीचे उद्दिष्ट शहरी आणि टियर-२ शहरांमध्ये एक मजबूत स्थान निर्माण करण्याचे आहे. आर्थिक वर्ष 26 पर्यंत ५० शहरांमध्ये १०० नवीन शोरूम आणि सेवा केंद्रे उघडण्याची योजना आहे.
ओबेन इलेक्ट्रिक उच्च-कार्यक्षमता असलेल्या एलएफपी बॅटरी, मोटर्स, फास्ट चार्जर आणि वाहन नियंत्रण युनिट्स यासारखे सर्व आवश्यक घटक स्वतः डिझाइन, विकसित आणि तयार करते. मार्केटमध्ये सध्या कंपनीची Oben Rorr EZ ला ग्राहकांकडून चांगली मागणी मिळत आहे.
ओबेन इलेक्ट्रिकने अलीकडेच भारतीय ई-मोटरसायकल बाजारात ओबेन रोअर ईजी (ईझेड) लाँच केली, ज्याची सुरुवातीची किंमत ८९,९९९ रुपये आहे. या बाईकमध्ये उत्तम अॅक्सिलरेशन आहे, जे फक्त 3.3 सेकंदात ०-४० किमी/ताशी वेग पकडू शकते. ही बाईक ९५ किमी/ताशी टॉप स्पीड देते. ही ईव्ही तीन बॅटरी व्हेरियंटमध्ये येते.
कंपनी अजूनही त्यांची प्रमुख बाईक, ओबेन रोअर ऑफर करते, जे त्याच्या उत्कृष्ट फीचर्ससाठी ओळखली जाते. ओबेनच्या मॉडेलमध्ये उच्च-कार्यक्षमता असलेल्या एलएफपी (लिथियम आयर्न फॉस्फेट) बॅटरी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.