Diwali 2025 मध्ये Bajaj Pulsar Bikes वर मिळतंय मोठेमोठे डिस्कॉउंट्स,
प्रत्येक दिवाळीत भारतीय ऑटो बाजार वाहनाच्या खरेदी विक्रीने गजबजून जाते. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अनेक जण बाईक खरेदी करत असतात. तसेच, या काळात अनेक ऑटो कंपन्या सुद्धा त्यांच्या वाहनांवर दमदार डिस्काउंट ऑफर करत असतात. आता Bajaj कंपनीने पल्सर बाईक्सवर डिस्काउंट ऑफर जाहीर केली आहे.
या दिवाळीत, बजाज ऑटो त्यांच्या लोकप्रिय बजाज पल्सर बाईक्सवर प्रभावी कॅशबॅक देत आहे. ही ऑफर फक्त 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत वैध आहे. चला या बजाज पल्सर मॉडेलवरील डिस्काउंटबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. या ऑफरमध्ये Classic, N, NS आणि RS सीरीजच्या मोटारसायकलींचा समावेश आहे.
बजाजची सर्वात लोकप्रिय मोटरसायकल श्रेणी म्हणजे पल्सर क्लासिक रेंज, ज्यामध्ये Pulsar 125, Pulsar 150 आणि Pulsar 220F या मॉडेल्सचा समावेश आहे. ही बाईक सिरीज त्याच्या आयकॉनिक मस्क्युलर लूक, दमदार इंजिन आणि उत्कृष्ट फीचर्ससाठी ओळखली जाते. सध्या कंपनीकडून आकर्षक कॅशबॅक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. यात पल्सर 125 कार्बन फायबर व्हेरिएंटवर 4000, निऑन स्प्लिट-सीट व्हेरिएंटवर 2000, तर पल्सर 150 आणि 220एफ मॉडेल्सवर 3000 पर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.
Diwali 2025 मध्ये Royal Enfield च्या ‘या’ 5 बाईक मार्केट गाजवणार, GST मुळे किंमत झाली स्वस्त
बजाजची पल्सर N सिरीज ही कंपनीच्या सर्वात आधुनिक आणि तंत्रज्ञानयुक्त बाईक श्रेणींपैकी एक आहे. या सिरीजमध्ये N125, N160 आणि N250 हे मॉडेल्स समाविष्ट आहेत. या बाईक्स आकर्षक डिझाइन, उत्कृष्ट परफॉर्मन्स, उत्तम मायलेज आणि किफायती किमतीसाठी ओळखल्या जातात. सध्या फक्त N160 आणि N250 मॉडेल्सवरच ऑफर लागू आहे, ज्यामध्ये N160 वर ₹5,000 आणि N250 वर ₹3,000 इतका कॅशबॅक मिळत आहे.
पल्सर NS सिरीज ही बजाजच्या सर्वात स्पोर्टी आणि ॲग्रेसिव्ह लूक असलेल्या बाईक्सची श्रेणी आहे. या सिरीजमध्ये Pulsar NS125, NS160, NS200 आणि NS400Z ही मॉडेल्स समाविष्ट आहेत. सध्या NS125 वर 2,500, NS160 आणि NS200 वर 5,000 तर NS400Z वर 3,000 इतका कॅशबॅक ऑफर मिळत आहे. दमदार परफॉर्मन्स आणि आकर्षक डिझाइनमुळे ही सिरीज तरुण रायडर्समध्ये विशेष लोकप्रिय आहे.
RS200 हे पल्सरचे फेयर्ड मॉडेल आहे, जे NS200 वर आधारित आहे. या दिवाळीत, RS200 वर एकूण 3,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळत आहे. ही ऑफर पल्सर बाईक्सना आणखी परवडणारी बनवते.