Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bajaj Pulsar N160 चा नवीन व्हेरिएंट लाँच, यंदा ‘या’ सेफ्टी फिचरकडे विशेष लक्ष

बजाजने देशात अनेक उत्तम बाईक ऑफर केल्या आहेत. नुकतेच बजाज कंपनीने Bajaj Pulsar N160 चा नवीन व्हेरिएंट मार्केटमध्ये लाँच केला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 11, 2025 | 05:05 PM
फोटो सौजन्य: @ramaswami120 (X.com)

फोटो सौजन्य: @ramaswami120 (X.com)

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय मार्केटमध्ये दिवसेंदिवस बाईक्सच्या विक्रीत वाढ होताना दिसत आहे. यातही काळानुसार ग्राहकांच्या मागणीत बदल दिसून येत आहे. पूर्वी, बाईक खरेदी करताना अनेक जण फक्त त्याच्या मायलेजकडे लक्ष देत असत. मात्र, आज ही स्थिती बदलताना दिसत आहे. आजचा ग्राहक आपल्या बाईकमध्ये आकर्षक लूक सुद्धा पाहत असतो. अशातच आता बजाजने त्यांच्या दमदार बाईकचा नवीन व्हेरिएंट लाँच केला आहे.

बजाज ऑटो त्यांच्या लोकप्रिय Bajaj Pulsar N160 लाइनअपचा विस्तार करण्यावर काम करत आहे. कंपनीने आता त्याचा एक नवीन व्हेरिएंट लाँच केला आहे. या नवीन व्हेरिएंटमध्ये सिंगल-सीट आणि ड्युअल-चॅनेल ABS सारखी फीचर्स आहेत, ज्याची दिल्लीमध्ये एक्स-शोरूम किंमत 1.25 लाख रुपये आहे. त्यात इतर अनेक उत्तम फीचर्ससह अपडेट केले गेले आहे. चला त्याबद्दल जाणून घेऊया.

अख्खं मार्केट आता आपलंय ! Tata च्या ‘या’ कारने June 2025 मध्ये सर्वच ऑटो ब्रँड्सना दिली धोबीपछाड

Pulsar N160 चा व्हेरिएंटनुसार किंमत

या बाईकचे चार वेगवेगळे व्हेरिएंट बाजारात उपलब्ध आहेत, आणि प्रत्येक व्हेरिएंटच्या फीचर्सनुसार किंमत ठरवण्यात आली आहे. बेसिक सिंगल सीट मॉडेलची किंमत 1,22,720 रुपये आहे. यानंतर सिंगल सीट ड्युअल चॅनेल एबीएस** (नवीन मॉडेल) व्हेरिएंटची किंमत 1,25,722 रुपये इतकी आहे. थोडी अधिक आरामदायक आणि स्पोर्टी लूक देणारी स्प्लिट सीट व्हेरिएंटची किंमत 1,26,669 रुपये आहे. टॉप व्हेरिएंट इनव्हर्टेड फोर्क ची किंमत 1,36,992 रुपये ठेवण्यात आली आहे.

डिझाइन

या नवीन व्हेरिएंटचे डिझाइन स्टॅंडर्ड बजाज पल्सर N160 सारखेच ठेवण्यात आले आहे. यात स्प्लिट-सीट सेटअपऐवजी सिंगल-पीस सीट आहे. सिंगल-पीस सीट देण्यामागील उद्देश म्हणजे बाईक पिलियन रायडरसाठी थोडी अधिक आरामदायी बनवणे. याशिवाय, स्प्लिट रीअर ग्रॅब रेल देखील सिंगल-पीस युनिटने बदलण्यात आली आहे.

ADAS सेफ्टी फिचर आणि 9 एअरबॅग्स ! Fortuner सारखीच Toyota Camry 2025 पॉवरफुल आहे का?

सस्पेंशन आणि ब्रेकिंग सिस्टम

नवीन बजाज पल्सर N160 मध्ये 37 मिमी टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मोनोशॉक सस्पेंशनसह ड्युअल-चॅनेल ABS आहे, जे एंट्री-लेव्हल व्हर्जनपेक्षा खूपच चांगले बनवते. बेस-स्पेसिफिकेशनच्या 230 मिमीच्या तुलनेत यात 300 मिमी फ्रंट डिस्क आहे आणि आता 280 मिमी रिअर डिस्क ब्रेक आहे. 17-इंच अलॉय व्हील्समध्ये ट्यूबलेस टायर्स आहेत, जे 100-सेक्शन फ्रंट आणि 130-सेक्शन रिअर आहेत. याचा ग्राउंड क्लीयरन्स 165 मिमी, सीटची उंची 795 मिमी, फ्युएल टॅंक 14-लिटर आणि कर्ब वजन 154 किलो आहे.

Pulsar N160 इंजिन

या बाईकमध्ये 164.82 सीसी, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन वापरले आहे, जे 16 पीएस पॉवर आणि 14.65 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.

Web Title: Bajaj pulsar n160 new variant launched know price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2025 | 05:05 PM

Topics:  

  • auto news
  • automobile

संबंधित बातम्या

Diwali 2025 मध्ये कार खरेदी करण्याचा प्लॅन? मग ‘या’ स्मार्ट टिप्स वापरा आणि हजारोंची बचत करा
1

Diwali 2025 मध्ये कार खरेदी करण्याचा प्लॅन? मग ‘या’ स्मार्ट टिप्स वापरा आणि हजारोंची बचत करा

इथे GST कमी तिथे Tata च्या ‘या’ कारची किंमत 1.55 लाखांपर्यंत कमी, कोणता व्हेरिएंट खरेदी केल्यास किती होईल फायदा?
2

इथे GST कमी तिथे Tata च्या ‘या’ कारची किंमत 1.55 लाखांपर्यंत कमी, कोणता व्हेरिएंट खरेदी केल्यास किती होईल फायदा?

EKA Mobility चा मुंबईत विस्तार, नवीन डिलरशिपच्‍या उद्घाटनाची केली घोषणा
3

EKA Mobility चा मुंबईत विस्तार, नवीन डिलरशिपच्‍या उद्घाटनाची केली घोषणा

लक्झरी लूक, 6 ड्रायव्हिंग मोड अन् एक कमाल अनुभव! Abhishek Sharma ला मिळालेली HAVAL H9 मध्ये आहेत धमाकेदार फीचर्स
4

लक्झरी लूक, 6 ड्रायव्हिंग मोड अन् एक कमाल अनुभव! Abhishek Sharma ला मिळालेली HAVAL H9 मध्ये आहेत धमाकेदार फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.