फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट ऑफर करत असतात. यातीलच एक आघाडीचे नाव म्हणजे टाटा मोटर्स. टाटाने नेहमीच देशातील ग्राहकांच्या मागणीनुसार उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर केल्या आहेत. सध्या कंपनी इलेक्ट्रिक कार्सच्या विक्रीवर लक्ष देत आहे.
ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात सुद्धा टाटा मोटर्स यशस्वी ठरली आहे. नुकताच जून 2025 मधील सेल्स रिपोर्ट जाहीर झाला आहे, ज्यात कंपनीच्या कारने दमदार कामगिरी केली आहे.
टाटा मोटर्स ही भारतातील प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपन्यांपैकी एक आहे. त्यांच्या प्रसिद्ध कार Tata Nexon ने जून 2025 मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचा विक्रम प्रस्थापित केला आहे. परंतु, हा आकडा जून 2024 च्या तुलनेत सुमारे 4% कमी आहे, जेव्हा 12,066 युनिट्स विकल्या गेल्या होत्या. तरीही, नेक्सॉनने उत्कृष्ट कामगिरी केली आणि सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. तसेच, टियागो आणि अल्ट्रोझची विक्रीही गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडी वाढली आहे. चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अयोsss ! ‘ही’ आहे सर्वात पातळ कार, 2 सीट्स, 4 चाकं आणि रुंदी 19 इंच, व्हिडिओ पाहून चाटच पडाल
जून 2025 मध्ये 11,602 युनिट्सच्या विक्रीसह टाटा नेक्सनने यादीत अव्वल स्थान पटकावला आहे. जून 2024 च्या 12,066 युनिट्सच्या विक्रीपेक्षा हा आकडा थोडा कमी आहे, परंतु नेक्सॉन अजूनही टाटाची सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. वर्ष-दर-वर्षाच्या तुलनेत विक्रीत 4% ची किरकोळ घट झाली.
जून 2025 मध्ये 10,446 युनिट्ससह टाटा पंच दुसऱ्या क्रमांकावर राहिला. गेल्या वर्षी जून 2024 मध्ये त्याची विक्री 18,238 युनिट्स होती. म्हणजेच विक्रीत सुमारे 43% घट झाली आहे. मायक्रो एसयूव्ही सेगमेंटमध्ये ही घसरण एक मोठा धक्का मानली जाते.
जून 2025 मध्ये टियागोने चांगला कमबॅक केले आहे. या कॉम्पॅक्ट हॅचबॅकच्या 6,032 युनिट्स विकल्या गेल्या, जे गेल्या वर्षीच्या 5,174 युनिट्सपेक्षा 17% जास्त आहे. टाटासाठी हे एक चांगले लक्षण आहे की ग्राहक आता पुन्हा छोट्या कारकडे परतत आहेत.
जून 2025 अल्ट्रोझच्या विक्रीतही थोडीशी वाढ झाली आहे. जून 2025 मध्ये 3,974 युनिट्स विकल्या गेल्या, जे जून 2024 मधील 3,937 युनिट्सपेक्षा फक्त 1% जास्त आहे. या लोकप्रिय प्रीमियम हॅचबॅकच्या स्थिर विक्रीवरून बाजारपेठेतील या कारची पकड मजबूत असल्याचे दिसून येते.
स्टाइल सोबतच मिळेल जबरदस्त सेफ्टी ! फक्त 1.5 लाखात मिळताय ‘या’ 5 दमदार बाईक्स
जून 2025 मध्ये टाटाच्या नवीन एसयूव्ही कर्व्हने 2,060 युनिट्स विकल्या. हा आकडा मे 2025 मध्ये 3,063 युनिट्सवरून मासिक आधारावर 33% घट दर्शवितो. परंतु नवीन कारसाठी ही समाधानकारक सुरुवात मानली जाऊ शकते.