
फोटो सौैजन्य: iStock
पूर्वी ग्राहक फक्त कारच्या मायलेज आणि किंमत लक्षात ठेवूनच कार खरेदी करत असत. मात्र, आताच ग्राहक कारमधील सेफ्टी फीचर्सवर सुद्धा विशेष लक्ष देत असतो. त्यातही कारमध्ये 6 एअरबॅग्स असणे महत्वाचे! जर तुमचा बजेट 5 लाखांपर्यंत असेल आणि तुम्ही उत्कृष्ट मायलेज, फीचर्स आणि सुरक्षितता देणारी कार शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज भारतातील अनेक कंपन्या 6 एअरबॅग्ज सारख्या सेफ्टी फीचर्ससह अतिशय परवडणाऱ्या किमतीत कार ऑफर करतात. यामध्ये Maruti, Tata आणि Renault सारख्या कंपन्या समाविष्ट आहेत. चला काही सर्वोत्तम कार पाहूयात.
Mahindra XEV 9S चा डिझाइन झाला रिव्हील, ‘या’ दमदार फीचर्सने कारची शोभा वाढवली!
ही भारतातील सर्वात परवडणाऱ्या मायक्रो एसयूव्हींपैकी एक आहे. जीएसटी कपातीनंतर याची सुरुवातीची किंमत आता 3.49 लाख रुपये आहे, ज्यामुळे ती बजेट खरेदीदारांसाठी एक उत्तम पर्याय बनते. याचे बॉक्सी डिझाइन, 180 मिमी ग्राउंड क्लिअरन्स आणि एसयूव्ही-शैलीतील देखावा तिला आणखी वेगळे करतो. यात 1.0-लिटर K10C पेट्रोल इंजिन आहे जे 66 पीएस पॉवर आणि 89 एनएम टॉर्क निर्माण करते. सीएनजी व्हेरिएंट 33 किमी/किलो पर्यंत मायलेज देते.
ही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या छोट्या कारपैकी एक आहे या कारची किंमत 3.69 लाख पासून सुरू होतात. याचे 1.0 -लिटर K10B इंजिन 67 पीएस पॉवर जनरेट करते आणि CNG व्हेरिएंट 33.85 किमी/किलो पर्यंत मायलेज देते. कंपनीने याच्या टॉप व्हेरिएंटमध्ये पॉवर विंडो, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि सहा एअरबॅग्ज सारखी फीचर्स दिली आहेत.
कमी किमतीत एसयूव्हीसारखा लूक हवा असलेल्या ग्राहकांसाठी रेनॉल्ट क्विड एक उत्तम कार आहे. याची किंमत 4.29 लाख पासून सुरू होतात. त्यात 184 मिमीचा हाय ग्राउंड क्लिअरन्स आणि मजबूत एक्सटिरिअर डिझाइन आहे. क्विडमध्ये 1.0-लिटर SCe इंजिन आहे जे 68 पीएस पॉवर आणि 91 Nm टॉर्क जनरेट करते. त्याचे मायलेज प्रति लिटर 22 किमी पर्यंत पोहोचते. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात 8 इंचाचा टचस्क्रीन, रियर कॅमेरा आणि क्रूझ कंट्रोल देखील आहे.
ग्राहकांनो ‘या’ 2 Electric Cars ने तुमचं काय बिघडवलं! 30 दिवसात फक्त मोजून 1 कारची झाली विक्री
Tata Tiago ही सुरक्षित आणि दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. GST कमी झाल्यानंतर याची सुरुवातीची किंमत 4.57 लाख रुपये झाली आहे. यात दिलेला 1.2-लीटर Revotron इंजिन 86 PS पॉवर निर्माण करतो. ही कार पेट्रोल आणि CNG या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. मायलेजच्या बाबतीत ती 23 ते 26 kmpl पर्यंत परफॉर्मन्स देते. 7-इंच टचस्क्रीन, Harman Kardon साऊंड सिस्टम, ESP आणि 4-स्टार NCAP रेटिंग यांसह Tiago एक संपूर्ण पॅकेज मानली जाते.
Maruti Celerio ही भारतातील सर्वात फ्युएल-इफिशियंट कारपैकी एक आहे. याची सुरुवातीची किंमत 4.69 लाख रुपये आहे. यात दिलेले 1.0-लीटर इंजिन 67 PS पॉवर आणि 89 Nm टॉर्क प्रदान करते. CNG व्हेरिएंट 34 km/kg पर्यंत मायलेज देतो, ज्यामुळे मायलेजच्या बाबतीत ही कार सर्वात उत्तम पर्याय ठरते. कारमध्ये क्लायमेट कंट्रोल, 7-इंच टचस्क्रीन, 313 लिटरचा मोठा बूट स्पेस आणि ड्युअल एअरबॅग्स असे फीचर्स उपलब्ध आहेत.