फोटो सौजन्य: @TheANI_Official/ X.com
भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक कार्सना चांगली मिळत आहे. अनेक ग्राहक कार खरेदी करताना इंधनावर चालणाऱ्या कार खरेदी करण्यापेक्षा इलेक्ट्रिक कार खरेदी करतात. आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी Mahindra ने सुद्धा दोन दमदार इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑफर केल्या आहेत, ज्यांना ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आता कंपनी त्यांची तिसरी इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे.
महिंद्राने त्यांच्या आगामी इलेक्ट्रिक एसयूव्ही, Mahindra XEV 9S चे टीझर रिलीज केले आहे. ही कंपनीची तिसरी इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल. टीझरद्वारे याचे डिझाइन आणि फीचर्स हळूहळू उघड केले जात आहेत. या नवीन टिझरमध्ये याच्या एक्सटिरिअर आणि आतील बाजूचे अनेक महत्त्वाचे डिटेल्स उघड झाले आहेत.
Hyundai Creta दारात उभी असेल! 3 लाखाच्या Down Payment नंतर ‘इतकाच’ असेल EMI?
नवीन टीझर व्हिडिओची सुरुवात SUV च्या टॉप व्ह्यू ने होते, जो दिसायला Mahindra XUV700 सारखाच दिसतो. यात सनरूफ आणि शार्क-फिन अँटेना स्पष्टपणे पाहायला मिळतात. त्यानंतर SUV चा मागील भाग थोडकाच दिसतो, परंतु त्याची सविस्तर माहिती अद्याप गुप्त ठेवली आहे.
या टीझरमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे या कारचा फ्रंट प्रोफाइल. यात फुल-लेंथ LED DRL, बोमेरँग-शेप डिझाइन, व्हर्टिकल स्टॅक्ड हेडलाइट्स आणि ट्रायअँगल-स्टाइल हाउसिंग देण्यात आले आहे. या सर्व घटकांमुळे या SUV ला एकदम फ्यूचरिस्टिक आणि बोल्ड लूक मिळतो.
Yamaha XSR 155 समोर Royal Enfield Bullet सुद्धा फिकी! ‘या’ 5 गोष्टींमुळे तुम्हीही व्हाल बाईकचे फॅन
याआधी आलेल्या टीझरमध्ये या SUV च्या इंटिरिअरबाबत अनेक डिटेल्स पाहायला मिळाल्या आहेत. इंटिरिअर क्लिपमध्ये सीट्सवरील स्टिचिंग पॅटर्न स्पष्ट दिसतो. सीटच्या शोल्डर एरियावर सिल्व्हर प्लेट दिली आहे, ज्यामुळे त्याला प्रीमियम फिनिश मिळते.
यात Harman Kardon प्रीमियम साउंड सिस्टम, Dolby Atmos सपोर्ट, सॉफ्ट-टच मटेरियल, मेमरी सीट्स आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक यांसारखे आधुनिक फीचर्स देण्यात येणार आहेत. सीटिंग लेआउट अद्याप पूर्णपणे उघड झालेले नाही, परंतु अंदाज आहे की SUV 2-3-2 कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध होऊ शकते.
महत्त्वाचे म्हणजे, यात XEV 9e सारखाच बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता आहे. यात 79 kWh बॅटरी पॅक देण्यात येऊ शकतो, जो सिंगल चार्जमध्ये सुमारे 656 किमीची रेंज देऊ शकतो.






