फोटो सौजन्य: iStock
जून महिन्या येण्याअगोदरच महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात पावसाचे थैमान मांडले आहे. अशावेळी अनेकदा मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहतात. परिणामी शहरातील रस्ते देखील जलमय होतात. ज्याचा फटका बाईक आणि कार चालकांना जास्त बसतो. याव्यतिरिक्त अनेक अशा समस्या उद्भवतात, ज्या कारचालकांच्या डोकेदुखीचे कारण ठरू शकते. म्हणूनच आज आपण अशा काही कार केअर टिप्सबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.
पावसाळ्यात जेव्हा मुसळधार पाऊस पडतो आणि कार चालवली जाते तेव्हा व्हिसिबिलीटी कमी होते. त्यामुळे अशा परिस्थितीत कारचे वायपर विंडशील्ड स्वच्छ ठेवून व्हिसिबिलटी वाढवतात. जर पावसाळ्यात वायपरचे ब्लेड खराब झाले तर विंडशील्ड स्वच्छ ठेवणे कठीण होऊन बसते. त्यामुळे वायपर तपासा. जर ब्लेड खराब झाले तर वायपर बदलणे कधीही चांगले.
एकेकाळी मार्केट गाजवणारी बाईक अनुभवतेय विक्रीत दुष्काळ ! EV मॉडेलमुळे खेळच बिघडला
पावसाच्या वेळी कारचे टायर्स योग्यरित्या काम करणे आणखी महत्त्वाचे होते. जर असे झाले नाही तर रस्त्यावर चांगली ग्रीप राहत नाही आणि अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे कारचे टायर्स जीर्ण झाले असतील तर पावसाळ्यात कार चालवण्यापूर्वी ते बदलणे योग्य आहे. यासोबतच, टायर्समध्ये योग्य प्रेशरने हवा असणे देखील महत्त्वाचे आहे, ज्यामुळे कार चालवताना अधिक नियंत्रण मिळते.
आजकाल, कंपन्या कारच्या अंडरबॉडीवर अँटी-रस्ट कोटिंग लावत नाहीत. परंतु हे कोटिंग पावसाळ्यात तुमच्या कारला गंजण्यापासून वाचवू शकते. हे एक रबर कोटिंग आहे, जे कारच्या अंडरबॉडी आणि पाण्यामध्ये एक थर म्हणून काम करते आणि कारला गंजण्यापासून वाचवते. यामुळे कारचे आयुष्य देखील वाढते. म्हणून, पावसाळ्यात कार सुरक्षित ठेवण्यासाठी हे कोटिंग करणे आवश्यक आहे.
करोडोंचं कार कलेक्शन असणाऱ्या Virat Kohli ची पहिली कार कोणती होती? स्वतःच केला खुलासा
बऱ्याचदा, जेव्हा कारकडे दुर्लक्ष केले जाते तेव्हा त्याचा कारच्या वायरिंगवर परिणाम होतो. याशिवाय, काही कारमध्ये, उंदरांमुळे वायरिंग खराब होऊन जाते. ज्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. अनेक वेळा, शॉर्ट सर्किटमुळे कारला आग देखील लागते. म्हणून, पावसाळ्यापूर्वी कारचे वायरिंग तपासा आणि कुठेही कट असल्यास, ते योग्यरित्या झाकून ठेवा, जेणेकरून पाण्यामुळे वायरिंग शॉर्ट सर्किट होणार नाही.