फोटो सौजन्य: iStock
कार खरेदी करताना अनेक जण त्याची किंमत आणि मायलेजवर जास्त लक्षकेंद्रित करत असतात. त्यातही खासकरून शहरात राहणाऱ्या ग्राहकांचा अशा कार्सना पाठिंबा असतो, ज्या रोजच्या वापरात चांगला परफॉर्मन्स देतील. अनेकदा कार खरेदी करताना नेमकी कोणती कार खरेदी करावी याबाबत संभ्रम पाहायला मिळतो. जर तुम्ही सुद्धा उत्तम कारच्या शोधात असाल तर मग आज आपण 5 बेस्ट कारबद्दल जाणून घेऊयात.
मारुती सुझुकी सेलेरियो ही कार खास लहान, परवडणारी आणि जास्त मायलेज देणारी कार आहे. याचे 1.0-लिटर पेट्रोल इंजिन 25.24 किमी/लीटर मायलेज देते, तर सीएनजी व्हेरिएंट 35 किमी/किलो पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे. या कारमध्ये 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पुश-बटण स्टार्ट, रिअर पार्किंग सेन्सर आणि 6 एअरबॅग्ज अशी फीचर्स आहेत. याचे 313-लिटर बूट स्पेस आणि मारुतीचे विश्वसनीय सर्व्हिस नेटवर्क यामुळे ती ऑफिसमध्ये जाण्यासाठी एक उत्तम पर्याय बनते. याची सुरुवातीची किंमत 5.64 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
गोंडलच्या महाराजांजवळ आहे AMG च्या 9 पॉवरफुल कार्स, कलेक्शन पाहून व्हाल हैराण
रेनॉ क्विड आपल्या SUV स्टाईल डिझाइन आणि परवडणाऱ्या किंमतीमुळे खूपच लोकप्रिय आहे. यात दिलेले 1.0-लिटर पेट्रोल इंजिन प्रति लिटर 20 किमीपेक्षा जास्त मायलेज देते. क्विडमध्ये 8-इंच टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ड्युअल एअरबॅग्स आणि हाय ग्राउंड क्लिअरन्स यांसारखी फीचर्स मिळतात. याचे स्टायलिश डिझाइन आणि प्रीमियम केबिन ही कार विशेषत: तरुणांमध्ये लोकप्रिय बनवतात. या कारची सुरुवातीची किंमत 4.70 लाख रुपये (एक्स-शोरूम) असून ती बजेट कारच्या यादीत सर्वात अफोर्डेबल कार ठरते.
Hyundai Grand i10 Nios ही कार त्यांच्यासाठी बनवली आहे ज्यांना स्टाइल आणि फीचर्सचे कॉम्बिनेशन हवे आहे. त्याची किंमत 5.92 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते आणि त्यात प्रीमियम केबिन, मजबूत बिल्ड क्वालिटी आणि आरामदायी राइड मिळते. यात 1.2 -लिटर पेट्रोल आणि सीएनजी इंजिन दोन्ही पर्याय आहेत. इंटिरिअरमध्ये वायरलेस चार्जर, कूल्ड स्टोरेज, रिअर एसी व्हेंट्स आणि 6 एअरबॅग्ज सारख्या प्रगत फीचर्स आहेत.
संजय दत्तने खरेदी केली 4 कोटीची Mercedes Maybach GLS600, काय आहेत खास फिचर्स
टाटा टियागोची सर्वात मोठी ताकद म्हणजे याचे मजबूत बिल्ड क्वालिटी आणि सुरक्षितता. या कारला GNCAP क्रॅश टेस्टमध्ये 4-स्टार रेटिंग मिळाले आहे. टियागोमध्ये 1.2-लिटर पेट्रोल आणि CNG इंजिन पर्याय आहेत. याच्या इंटिरिअरमध्ये 10.25-इंच टचस्क्रीन, हरमन साउंड सिस्टम आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सारखे फीचर्स आहेत. 5 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीसह, ही कार बजेट-फ्रेंडली आणि सुरक्षित पर्याय आहे.
मारुती स्विफ्ट ही बऱ्याच काळापासून भारतीय ग्राहकांची पसंती आहे. याचे स्पोर्टी डिझाइन, विश्वासार्ह परफॉर्मन्स आणि उत्तम मायलेज या कारला दैनंदिन ऑफिस प्रवासासाठी परिपूर्ण बनवते. यात 1.2-लिटर पेट्रोल इंजिन आहे जे प्रति लिटर 23 किलोमीटर पर्यंत मायलेज देते. त्याच वेळी, सीएनजी व्हेरिएंट एआरएआयने दावा केलेला 32.85 किमी/किलो मायलेज देतो. कारमध्ये पुश-बटण स्टार्ट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि 6 एअरबॅग्ज सारख्या फीचर्सचा समावेश आहे.