
फोटो सौजन्य: Gemini
कार खरेदी करण्यापूर्वी बहुतांश खरेदीदार एक बजेट ठरवत असतात. त्याचबरोबर, कारमध्ये सनरूफ असावे की नाही हेही अनेक जण आधीच निश्चित करतात. सध्या काही कार कंपन्यांनी सर्वसामान्यांच्या बजेटमध्येही सनरूफसह आकर्षक मॉडेल्स बाजारात आणली आहेत. तुमचे बजेट सुमारे 7 लाख रुपये असेल आणि तुम्हाला सनरूफ असलेली कार घ्यायची असेल, तर या किमतीत काही उत्तम कार उपलब्ध आहेत. चला या कार्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
जास्त पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा! KTM च्या ”या’ बाईक्स झाल्या 27,000 रुपयांनी महाग
टाटा अल्ट्रोज ही प्रीमियम फीचर्ससह येणारी एक उत्तम हॅचबॅक कार आहे. यात पाच वेगवेगळ्या कलर ऑप्शन्स मिळतात आणि बाजारात या कारचे 22 व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत. अल्ट्रोजमध्ये कंपनीने सनरूफचा पर्यायही दिला आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 6.30 लाख रुपयांपासून सुरू होते. यात 1.2-लीटर रेवोट्रॉन इंजिन देण्यात आले असून ही कार पेट्रोल आणि CNG अशा दोन्ही पर्यायांत उपलब्ध आहे. बाय-फ्युअल व्हेरिएंटही उपलब्ध आहे. सुरक्षिततेसाठी या कारला भारत NCAP कडून 5-स्टार रेटिंग मिळाले आहे.
मारुती डिजायरलाही ग्लोबल NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग प्राप्त झाले आहे. यात ABS सहित सुरक्षिततेची अनेक फीचर्स मिळतात. डिजायर सात कलर पर्यायांसह उपलब्ध आहे. यात 1197 cc इंजिन देण्यात आले असून 5,700 rpm वर 81.58 PS पॉवर आणि 4,300 rpm वर 111.7 Nm टॉर्क मिळतो. मारुतीच्या या लोकप्रिय सेडानमध्ये इलेक्ट्रिक सनरूफचा समावेश करण्यात आला आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 6,25,600 रुपयांपासून सुरू होते.
भारतात ‘या’ कारचे फेसलिफ्ट व्हर्जन धडाधड लाँच होण्याच्या तयारीत, नवीन फीचर्सने असणार सुसज्ज
ह्युंदाई i20 हा 7 लाखांच्या रेंजबध्दल विचार करणाऱ्यांसाठी एक चांगला पर्याय आहे. तिची एक्स-शोरूम किंमत 6.87 लाख रुपयांपासून सुरू होते. यात 1.2-लीटर, 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. iVT ट्रान्समिशनमध्ये 87 bhp तर 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये 82 bhp पॉवर मिळते. ही कार नॉर्मल आणि स्पोर्ट्स अशा दोन ड्रायव्हिंग मोड्ससह येते. ह्युंदाईने या मॉडेलमध्येही सनरूफ फीचर दिले आहे.