फोटो सौजन्य: Gemini
भारतीय ऑटो बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. मात्र, काही कंपन्या अशा देखील आहेत, ज्या बदलत्या काळानुसार त्यांच्या कारचे अपडेटेड व्हर्जन लाँच करत असतात. या अपडेटेड वाहनांना ग्राहक देखील चांगला प्रतिसाद देतात.
भारताच्या वाहन विक्रीत सेडान कारचाही मोठा वाटा आहे. अनेक कंपन्या या सेगमेंटमध्ये उत्कृष्ट फीचर्ससह त्यांच्या कार ऑफर करतात. वृत्तानुसार, सध्याच्या दोन मिड साइझ सेडानसाठी फेसलिफ्ट लाँच करण्याची तयारी सुरू आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
माहितीनुसार, या कारचे फेसलिफ्ट व्हर्जन लवकरच देशात सादर केले जाऊ शकतात. ज्या कारमध्ये फेसलिफ्ट दिसू शकतात त्यात Skoda Slavia आणि Hyundai Verna यांचा समावेश आहे.
TVS Raider 125 की Pulsar NS125, पॉवर, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत कोणती बाईक सुसाट?
कंपनीकडून यासंदर्भात अजून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, ही कार अनेक वेळा टेस्टिंगदरम्यान दिसली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन व्हर्जनमध्ये स्प्लिट हेडलॅम्प सेटअप, अधिक एंग्युलर C-पिलर डिझाइन, तसेच 12.3 इंचाचे इन्फोटेनमेंट सिस्टम दिले जाईल. यामध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले यांचा सपोर्टही मिळेल. याशिवाय काही नवीन फीचर्स आणि अधिक प्रीमियम इंटीरियर देण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार, ह्युंदाई भारतात या सेडानचे फेसलिफ्ट मॉडेल मार्च 2026 पर्यंत लॉन्च करू शकते.
‘या’ Helmet ची जोरदार चर्चा! बुलेट प्रूफ जॅकेटसारखी सुरक्षा आणि किंमत फक्त…
स्कोडा आपल्या मिडसाईज सेडान Slavia ला फेसलिफ्ट अपडेटसह बाजारात आणण्याची तयारी करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या मॉडेलमध्ये नवीन बंपर डिझाइन, हेडलाइटमधील हलके बदल, नवीन टेललॅम्प्स आणि डायनॅमिक टर्न इंडिकेटर्स देण्यात येऊ शकतात. यासोबतच आणखी काही आधुनिक फीचर्स देखील जोडले जाऊ शकतात. ही अपडेटेड Slavia भारतात पुढील वर्षाच्या मध्यान्हापर्यंत लाँच केली जाऊ शकते.






