
फोटो सौजन्य: Gemini
भारतीय ऑटो बाजारात उत्तम मायलेज देणाऱ्या कार्सना नेहमीच मागणी दिसते. ग्राहक देखील अशा कारच्या शोधात असतात, ज्या त्यांना उत्तम रायडींग अनुभवासह चांगला मायलेज देईल. जर तुमचाही बजेट 10 लाखांचा असेल आणि या बजेटमध्ये तुम्ही उत्तम कारच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. चला काही बेस्ट मायलेज देणाऱ्या कार्सबद्दल जाणून घेऊयात.
CNG भरताना आपल्याला ड्रायव्हर कारमधून का उतरवतो? फक्त सेफ्टी नव्हे तर ‘ही’ देखील आहेत कारणं
Maruti Suzuki Celerio ही उत्तम मायलेज आणि कमी मेंटेनन्ससाठी ओळखली जाते. या कारची सुरुवातीची किंमत साधारणत 4.7 लाख रुपये आहे. ती Petrol आणि CNG या दोन्ही पर्यायांत उपलब्ध आहे. Petrol व्हेरिएंट सुमारे 26.6 km/l मायलेज देते, तर CNG व्हेरिएंट 35.12 km/kg पर्यंत चालते. हलकी, सहज हाताळता येणारी आणि रोजच्या शहरातील प्रवासासाठी योग्य अशी ही एक परफेक्ट “डेली कम्यूटर कार” मानली जाते.
Wagon R ही भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह आणि लोकप्रिय फॅमिली कारपैकी एक आहे. अंदाजे 5 लाख रुपये किंमतीत उपलब्ध असलेली ही कार 26.1 km/l मायलेज देते. याची हाय सीटिंग पोजिशन, रुंद केबिन आणि आरामदायी ड्रायव्हिंग अनुभव या कारला अनेकांच्या पसंतीची “ऑल-राउंडर” कार बनवतात. शहरातील ट्रॅफिकमध्येही ही कार सहज चालवता येते.
पहिली कार घेणाऱ्यांसाठी किंवा बजेट कमी असणाऱ्यांसाठी Alto K10 हा उत्तम पर्याय आहे. या कारची किंमत 3.7 लाख पासून सुरू होते आणि ती सुमारे 24.8 km/l मायलेज देते. कॉम्पॅक्ट आकार, कमी मेंटेनन्स आणि सोपी हॅंडलिंग यामुळे नवीन ड्रायव्हर्समध्ये Alto K10 खूप लोकप्रिय आहे. ऑफिसला जाणे किंवा शहरातील रोजच्या प्रवासासाठी ही विश्वासार्ह आणि किफायतशीर कार आहे.
एका लिटर पेट्रोलमध्ये New Hyundai Venue किती मायलेज देईल?
स्टायलिश लुकसोबत मायलेजही हवे असेल तर Hyundai Exter एक उत्कृष्ट पर्याय आहे. याची सुरुवातीची किंमत सुमारे 5.7 लाख असून ती 19 km/l पर्यंत मायलेज देते. SUV सारखा मॉडर्न लुक, High ग्राउंड क्लिअरन्स आणि फीचर-रिच इंटीरियरमुळे ही कार तरुणांना विशेष आवडते. बजेटमध्ये SUV फील हवी असणाऱ्यांसाठी Exter उत्तम ठरते.
Tata Punch ही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या Micro SUVs पैकी एक आहे. याचा बेस मॉडल अंदाजे 6 लाख रुपयांपासून सुरू होतो आणि ही सुमारे 18 km/l मायलेज देते. मजबूत बिल्ड क्वालिटी, 5-स्टार सेफ्टी रेटिंग, प्रीमियम इंटीरियर्स, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट आणि हाइट-अॅडजस्टेबल सीट्ससारखे फीचर्स यामुळे Punch ही छोट्या कुटुंबांसाठी सुरक्षित, स्टायलिश आणि विश्वासार्ह SUV ठरते.