Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

10 लाखांच्या बजेटमध्ये ‘तुफान’ मायलेज! ‘या’ Automatic SUVs चा दराराच वेगळा, परफॉर्मन्स तर एकदमच भारी

जर तुम्ही ऑटोमॅटिक कार खरेदी करण्याच्या विचार करत असाल आणि तुमचा बजेट 10 लाखांपर्यंतचा असेल, तर मग ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 21, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • ऑटोमॅटिक कारला देशात चांगली मागणी
  • 10 लाखांच्या बजेटमध्ये उत्तम ऑटोमॅटिक कार
  • जाणून घ्या संपूर्ण यादी
ऑटो बाजारात विविध प्रकारच्या कार ऑफर होत असतात. यातही, ग्राहकांना खासकरून ऑटोमॅटिक कार्स जास्त आवडतात. त्यामुळे कंपनी सुद्धा त्यांच्या कारच्या ऑटोमॅटिक व्हेरिएंट अधिक फीचर्ससह अपडेट करत असतात. मात्र, अनेकदा या कार्स महाग असतात. मात्र, जर तुमचे बजेट 10 लाखांपर्यंत असेल तर मग ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

शहरातील प्रचंड वाहतुकीमध्ये सतत गिअर्स बदलण्याच्या कटकटीपासून वाचण्यासाठी ‘ऑटोमॅटिक कार्स’ हा सर्वोत्तम पर्याय आहे. जर तुमचे बजेट १० लाख रुपयेअसेल, तर भारतीय बाजारपेठेत तुम्हाला अनेक उत्कृष्ट SUV कार्सचे पर्याय उपलब्ध होऊ शकतात. चला १० लाखांपेक्षा कमी किंमत असणाऱ्या टॉप 5 ऑटोमॅटिक SUV कार्सची माहिती जाणून घेऊयात.

New Renault Duster चा बेस व्हेरिएंट खरेदी करणे किती फायदेशीर? किमतीपासून ते फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

महिंद्रा एक्सयूव्ही 3XO (Mahindra XUV 3XO)

10 लाखांपेक्षा कमी बजेट असलेल्या सेगमेंटमध्ये, Mahindra XUV 3XO ही उपलब्ध असलेली सर्वात ‘प्रीमियम’ SUV आहे. यामध्ये 1.2-लिटरचे टर्बो-पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 111 hp इतकी पॉवर निर्माण करते. कार चालवण्याचा अनुभव अधिक सुखद आणि सहज करण्यासाठी, ही कार 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहता, यामध्ये 6 एअरबॅग्ज, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आणि चारही चाकांवर डिस्क ब्रेक्स यांसारखी प्रमाणित स्टॅंडर्ड फीचर्स उपलब्ध आहेत.

स्कोडा कायलॅक (Skoda Kylaq)

Skoda Kylaq चा बेस व्हेरिएंट Classic+ हा 10 लाखांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे. यात 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असून ते 115hp पॉवर देते. यासोबत 6-स्पीड टॉर्क कन्वर्टर गिअरबॉक्स मिळतो. सेफ्टी फीचर्समध्ये 6 एअरबॅग्स, रेन सेंसिंग वायपर्स आणि पार्किंग सेन्सरचा समावेश आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार 19.68 kmpl (ARAI) मायलेज देते. याची किंमत 9.25 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Honda Cars च्या किंमती गगनाला भिडण्याची शक्यता? ‘या’ तारखेपासून वाढू शकते किंमत

टाटा नेक्सॉन (TATA Nexon)

TATA Nexon मध्ये 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असून ते 120hp पॉवर देते. यामध्ये 6-स्पीड AMT गिअरबॉक्स दिला आहे. सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्स देण्यात आले आहेत. याशिवाय सनरूफ आणि ऑटोमॅटिक हेडलाइट्ससारखे प्रीमियम फीचर्सही मिळतात. कंपनीनुसार याचे मायलेज 17.18 kmpl (ARAI) आहे. याची एक्स-शोरूम किंमत 8 लाख रुपये आहे.

टोयोटा अर्बन क्रूझर टायसर (Toyota Urban Cruiser Taisor)

या कारची सर्वात मोठी खासियत म्हणजे तिचे मायलेज. कंपनीचा दावा आहे की ही SUV 22.8 kmpl (ARAI) मायलेज देते. यात 1.2 लिटर पेट्रोल इंजिन, अलॉय व्हील्स आणि ऑटोमॅटिक ACसारखे आवश्यक फीचर्स मिळतात. मात्र, सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्स, रिअर AC व्हेंट्स आणि LED हेडलाइट्ससारखे काही फीचर्स उपलब्ध नाहीत. याची एक्स-शोरूम किंमत 8.72 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी फ्रॉंक्स (Maruti Suzuki Fronx)

Maruti Suzuki Fronx मध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्स मिळतो. 10 लाखांखाली Delta आणि Delta+ हे दोन व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत. टॉप व्हेरिएंटमध्ये 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह 6-स्पीड टॉर्क कन्वर्टर गिअरबॉक्सचा पर्यायही मिळतो. याची एक्स-शोरूम किंमत 8.15 लाख रुपये आहे.

Web Title: Best mileage giving automatic suvs under 10 lakh rupees budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Mahindra XUV 3XO
  • SUV

संबंधित बातम्या

55 मिनिटांत कार एक्सचेंज! Nissan आणि Spinny चा ग्राहकांसाठी मोठा धमाका; मिळणार जबरदस्त एक्सचेंज बोनस
1

55 मिनिटांत कार एक्सचेंज! Nissan आणि Spinny चा ग्राहकांसाठी मोठा धमाका; मिळणार जबरदस्त एक्सचेंज बोनस

‘ही’ तर दिलदार कंपनी! कारची किंमत 5 लाख देखील नाही आणि त्यात मिळतंय 65000 रुपयांचे डिस्काउंट; नवीन किंमत…
2

‘ही’ तर दिलदार कंपनी! कारची किंमत 5 लाख देखील नाही आणि त्यात मिळतंय 65000 रुपयांचे डिस्काउंट; नवीन किंमत…

शरीर म्हणेल थांब पण बाईक चालतच राहील लांब! फुल टॅंकवर 900 किमीची रेंज देतात ‘या’ Bikes, किंमत…
3

शरीर म्हणेल थांब पण बाईक चालतच राहील लांब! फुल टॅंकवर 900 किमीची रेंज देतात ‘या’ Bikes, किंमत…

मुंबईकरांनो लक्ष द्या! आता तुमच्या नवीन दुचाकींसाठी ‘या’ नवीन नोंदणी मालिकेची सुरुवात
4

मुंबईकरांनो लक्ष द्या! आता तुमच्या नवीन दुचाकींसाठी ‘या’ नवीन नोंदणी मालिकेची सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.