Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JSW Motors ची AWS सोबत मोठी पार्टनरशिप! Connected Car Data आता भारतातच सुरक्षित राहणार

जेएसडब्ल्यू मोटर्सच्या पहिल्या कारच्या लाँचपूर्वीच कंपनीने AWS सोबत मोठी पार्टनरशिप केली आहे. आता गाडीचे लोकेशन, ड्रायव्हिंग डेटा आणि कॅमेरा फुटेज भारतातील सर्व्हरवर स्टोअर होणार आहे. पण या संपूर्ण व्यवस्थेत टाटा एलेक्सी आणि एअरटेलची भूमिका नेमकी काय असणार?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 13, 2026 | 09:25 PM
JSW Motors Partners With AWS For Connected Car Data (फोटो सौजन्य-AI एआय)

JSW Motors Partners With AWS For Connected Car Data (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • जेएसडब्ल्यू मोटर्सने AWS सोबत पार्टनरशिप करून कनेक्टेड कारचा डेटा भारतातील सर्व्हरवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
  • टाटा एलेक्सी T-Box विकसित करणार असून एअरटेल गाड्यांना नेटवर्क कनेक्टिव्हिटी देण्याची जबाबदारी सांभाळणार आहे.
  • छत्रपती संभाजीनगरमध्ये तयार होणाऱ्या कंपनीच्या पहिल्या कारमध्ये ही कनेक्टेड कार टेक्नोलॉजी वापरली जाणार आहे.

भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये एन्ट्री करण्यासाठी सज्ज असलेल्या JSW Motors यांची आता टेक्नोलॉजीच्या क्षेत्रातही मोठी तयारी सुरू केली आहे. कंपनीने अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (AWS) सोबत पार्टनरशिप केली असून, आपल्या Connected Car Platform, Cloud Platform आणि India Data Storage सुविधांसाठी भारतातील सर्व्हरचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यवस्थेत टाटा एलेक्सी (Tata Elxsi) आणि एअरटेल (Airtel) यांचाही सहभाग असणार आहे. त्यामुळे Vehicle Data Security आणि कस्टमरच्या माहितीवर नियंत्रण ठेवण्यावर कंपनीचा भर दिसत आहे.

कारचा डेटा भारतातच राहणार

या पार्टनरशिपनुसार, जेएसडब्ल्यू मोटर्सच्या कनेक्टेड कार सिस्टिममधून तयार होणारा डेटा भारतात असलेल्या AWS सर्व्हरवर स्टोअर केला जाणार आहे. यामध्ये गाडी चालवण्यासंबंधीची माहिती, लोकेशन डेटा तसेच कारमध्ये बसवलेल्या कॅमेऱ्यांमधून रेकॉर्ड होणाऱ्या व्हिडिओ फुटेजचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या डेटाची मालकी आणि त्यावरील नियंत्रण जेएसडब्ल्यू मोटर्सकडेच राहणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

भारतात येणार 5 नवीन Adventure Bikes! Royal Enfield, Hero आणि Bajaj च्या बाइक्सची तयारी सुरू

टाटा एलेक्सी आणि एअरटेलचीही साथ

या संपूर्ण टेक्नोलॉजी सिस्टिममध्ये भारतीय कंपन्यांची महत्त्वाची भूमिका असेल. गाडी आणि क्लाउड प्लॅटफॉर्म यांच्यात कनेक्शन तयार करणारे टेलिमॅटिक्स कंट्रोल युनिट स्थानिक पातळीवर विकसित करण्यासाठी जेएसडब्ल्यू मोटर्सने टाटा एलेक्सीशी पार्टनरशिप केली आहे. तर गाड्यांना नेटवर्क कनेक्टिव्हिटी देण्याची जबाबदारी एअरटेलकडे असेल. यामुळे गाडीतील विविध सिस्टिममधून मिळणारी माहिती क्लाउडपर्यंत पोहोचवणे शक्य होईल.

डेटा प्रायव्हसीसाठी भारतीय कायद्यांचे पालन

आजच्या कनेक्टेड कारमध्ये ड्रायव्हिंग पॅटर्न, गाडीचे लोकेशन आणि केबिनमधील हालचालींसारखी माहिती जमा केली जाते. त्यामुळे या माहितीची सुरक्षितता हा ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी महत्त्वाचा विषय बनला आहे. JSW मोटर्सच्या म्हणण्यानुसार, डेटाचे व्यवस्थापन कंपनीच्या सुरक्षा धोरणांसोबतच माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 आणि डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायदा 2023 यानुसार केले जाईल.

Denza D9 and Z9 GT: भारतात डेंझा D9 आणि Z9 GT इलेक्ट्रिक कार लाँच! किंमत 90 लाखांपासून सुरु, 1,140 hp पॉवरची कारही दाखल

पहिल्या कारच्या लाँचपूर्वी मोठी तयारी

जेएसडब्ल्यू मोटर्सची पहिली पॅसेंजर कार छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथील कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये तयार केली जाणार आहे. या पहिल्या कारच्या टेक्नोलॉजी आर्किटेक्चरचा महत्त्वाचा भाग म्हणून Connected Car Platform काम करणार आहे. म्हणजेच कंपनी केवळ कारचे प्रोडक्शन करण्यावर नाही, तर डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि डेटा सुरक्षेवरही फोकस करत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जेएसडब्ल्यू मोटर्सने कोणत्या कंपनीसोबत पार्टनरशिप केली आहे?

    Ans: जेएसडब्ल्यू मोटर्सने आपल्या Connected Car Platform साठी अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (AWS) सोबत पार्टनरशिप केली आहे.

  • Que: जेएसडब्ल्यू मोटर्सच्या कनेक्टेड कारचा डेटा कुठे स्टोअर होणार आहे?

    Ans: कंपनीच्या कनेक्टेड कारमधून तयार होणारा ड्रायव्हिंग डेटा, लोकेशन माहिती आणि कॅमेरा फुटेज भारतातील AWS सर्व्हरवर स्टोअर केले जाणार आहे.

  • Que: जेएसडब्ल्यू मोटर्सच्या या टेक्नोलॉजीमध्ये टाटा एलेक्सी आणि एअरटेलची काय भूमिका आहे?

    Ans: टाटा एलेक्सी टेलिमॅटिक्स कंट्रोल युनिट (T-Box) विकसित करण्यासाठी मदत करणार आहे. तर एअरटेल वाहनांना नेटवर्क कनेक्टिव्हिटी पुरवणार आहे.

Web Title: Jsw motors aws connected car data india auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 09:25 PM

Topics:  

  • automobile
  • tata motors

संबंधित बातम्या

भारतात येणार 5 नवीन Adventure Bikes! Royal Enfield, Hero आणि Bajaj च्या बाइक्सची तयारी सुरू
1

भारतात येणार 5 नवीन Adventure Bikes! Royal Enfield, Hero आणि Bajaj च्या बाइक्सची तयारी सुरू

Denza D9 and Z9 GT: भारतात डेंझा D9 आणि Z9 GT इलेक्ट्रिक कार लाँच! किंमत 90 लाखांपासून सुरु, 1,140 hp पॉवरची कारही दाखल
2

Denza D9 and Z9 GT: भारतात डेंझा D9 आणि Z9 GT इलेक्ट्रिक कार लाँच! किंमत 90 लाखांपासून सुरु, 1,140 hp पॉवरची कारही दाखल

भारतात इलेक्ट्रिक कार विक्रीचा नवा विक्रम! 2026 मध्ये 3 लाखांचा टप्पा पार, टाटा मोटर्स आघाडीवर
3

भारतात इलेक्ट्रिक कार विक्रीचा नवा विक्रम! 2026 मध्ये 3 लाखांचा टप्पा पार, टाटा मोटर्स आघाडीवर

भारत मोबिलिटी एक्स्पो 2027 मध्ये मारुती सुझुकीच्या 2 नवीन कारचा ग्लोबल डेब्यू होण्याची शक्यता!
4

भारत मोबिलिटी एक्स्पो 2027 मध्ये मारुती सुझुकीच्या 2 नवीन कारचा ग्लोबल डेब्यू होण्याची शक्यता!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.