Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ तारखेपासून BMW च्या Cars महागणार! जाणून घ्या किती रुपयांनी वाढणार किंमत

BMW त्यांच्या वाहनांच्या किमतीत एप्रिल 2026 पासून वाढ करण्याच्या तयारीत दिसत आहे. कंपनी त्यांच्या वाहनांच्या किमतीत 2 टक्क्यांपर्यंत वाढ करणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 20, 2026 | 06:34 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • बीएमडब्ल्यू कार्सच्या किमती महागणार
  • एप्रिल 2026 पासून किंमत वाढणार
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
भारतात आपल्याला अनेक लक्झरी कार उत्पादक कंपन्या पाहायला मिळतात. अशीच एक लोकप्रिय कंपनी म्हणजे BMW. या कंपनीच्या कार आपल्याला नेहमीच अनेक सेलिब्रेटी आणि उद्योगपतींकडे पाहायला मिळतात. मात्र, आता कंपनीने त्यांच्या कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

BMW India ने जाहीर केले आहे की त्यांच्या सर्व कार्स आणि Mini रेंजमधील गाड्यांच्या किमतींमध्ये 2% वाढ केली जाणार आहे. कंपनीचे सीईओ Hardeep Singh Brar यांच्या मते, रुपयाची घसरलेली किंमत, वाहतूक खर्चात वाढ आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. बीएमडब्ल्यू कार्सच्या किमती 1 एप्रिल 2026 पासून वाढतील.

Honda Cars च्या किंमती गगनाला भिडण्याची शक्यता? ‘या’ तारखेपासून वाढू शकते किंमत

एप्रिलपासून दर वाढणार

BMW आपली वाहने दोन पद्धतींनी विकते आणि . भारतात तयार होणाऱ्या मॉडेल्समध्ये BMW 2 Series Gran Coupe, BMW 3 Series Long Wheelbase, BMW 5 Series Long Wheelbase, BMW 7 Series, BMW X1, BMW X3, BMW X5, BMW X7, BMW M340i आणि BMW iX1 Long Wheelbase यांचा समावेश आहे.

दुसरीकडे, पूर्णपणे आयात (CBU) स्वरूपात येणाऱ्या गाड्यांमध्ये BMW i5, BMW i7, BMW i7 M70, BMW iX, BMW Z4 M40i, BMW M2 Coupe, BMW M2 CS, BMW M4 Competition, BMW M4 CS, BMW M5, BMW M8 Competition Coupe, BMW XM तसेच Mini Cooper S, Mini Countryman E, Mini JCW Countryman All4, Mini Countryman SE आणि Mini Convertible यांचा समावेश आहे.

फेब्रुवारी 2026 मध्ये ‘या’ Bikes चा वेगळाच दरारा! ग्राहकांचा मिळाला उदंड प्रतिसाद

BMW ची नवीन कार

BMW ने आपली नवीन BMW M2 CS भारतात 1.66 कोटी रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत लाँच केली आहे. BMW M4 CS नंतर भारतीय बाजारात आलेले हे ब्रँडचे दुसरे CS मॉडेल आहे. ही कार पूर्णपणे परदेशातून (CBU) आयात केली जाईल. रेग्युलर M2 च्या तुलनेत ही अधिक पॉवरफुल आणि हलकी आहे. याच्या सस्पेंशन आणि बॉडीमध्ये विशेष बदल करण्यात आले असून त्यामुळे कार अधिक स्थिर आणि उत्कृष्ट कंट्रोलसह चालवता येते.

BMW M2 CS चे इंजिन

या कारमध्ये 3.0 लिटर ट्विन-टर्बो इंजिन देण्यात आले आहे, जे 530 HP पॉवर आणि 650 Nm टॉर्क निर्माण करते. हेच इंजिन BMW M4 GT3 EVO रेसिंग कारमध्येही वापरले जाते. ही कार अवघ्या 3.8 सेकंदांत 0 ते 100 किमी/तास वेग गाठते आणि तिचा कमाल वेग 302 किमी/तास आहे.

Web Title: Bmw car prices hike by 2 percent from 1 april 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 06:34 PM

Topics:  

  • automobile
  • BMW
  • car prices
  • Price Hike

संबंधित बातम्या

फेब्रुवारी 2026 मध्ये ‘या’ Bikes चा वेगळाच दरारा! ग्राहकांचा मिळाला उदंड प्रतिसाद
1

फेब्रुवारी 2026 मध्ये ‘या’ Bikes चा वेगळाच दरारा! ग्राहकांचा मिळाला उदंड प्रतिसाद

New Renault Duster चा बेस व्हेरिएंट खरेदी करणे किती फायदेशीर? किमतीपासून ते फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही
2

New Renault Duster चा बेस व्हेरिएंट खरेदी करणे किती फायदेशीर? किमतीपासून ते फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

जुनं असलं तरी खणखणीत वाजतं नाणं! मार्केटमध्ये ‘या’ Two Wheelers ला मिळते तगडी रिसेल व्हॅल्यू
3

जुनं असलं तरी खणखणीत वाजतं नाणं! मार्केटमध्ये ‘या’ Two Wheelers ला मिळते तगडी रिसेल व्हॅल्यू

Audi आणतेय आतापर्यंतची सर्वात किफायतशीर Electric Hatchback Car, जाणून घ्या अपेक्षित किंमत?
4

Audi आणतेय आतापर्यंतची सर्वात किफायतशीर Electric Hatchback Car, जाणून घ्या अपेक्षित किंमत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.