Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMW इंडियाच्या कार पुन्हा महागणार; रुपयाच्या घसरणीचा ग्राहकांना मोठा फटका

BMW इंडिया भारतात आपल्या वाहनांच्या किमती पुन्हा वाढवणार आहे. 2026 मध्ये आतापर्यंत कंपनीने 4-5% पर्यंत दरवाढ केली असून, रुपयाची घसरण आणि वाढलेल्या कमोडिटी खर्चामुळे आणखी एका किंमतवाढीचा विचार सुरू आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 12, 2026 | 12:08 PM
BMW इंडियाच्या कार पुन्हा महागणार; रुपयाच्या घसरणीचा ग्राहकांना मोठा फटका
Follow Us
Follow Us:
  • रुपयाच्या घसरणीमुळे बीएमडब्ल्यू इंडियाच्या वाहनांच्या किमती 2026 मध्ये पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
  • 2026 मध्ये आतापर्यंत बीएमडब्ल्यू आणि मिनीच्या किमती 4-5% पर्यंत वाढल्या आहेत.
  • नवीन बीएमडब्ल्यू 7 सीरिज आणि i7 ची डिलिव्हरी भारतात ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार आहे.
BMW इंडिया भारतीय ग्राहकांना आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. रुपयाची वाढती घसरण आणि वाढलेल्या कमोडिटी खर्चामुळे कंपनी आपल्या संपूर्ण वाहन पोर्टफोलिओच्या किमती BMW पुन्हा वाढवणार आहे. 2026 मध्ये ही कंपनीची चौथी किंमतवाढ ठरणार आहे.

BMW ग्रुप इंडियाचे अध्यक्ष आणि सीईओ हरदीप सिंह ब्रार यांनी सांगितले की, परकीय चलनातील बदलांचा कंपनीच्या मार्जिनवर मोठा परिणाम झाला आहे. 2026 मध्ये आतापर्यंत BMW आणि मिनी वाहनांच्या किमतींमध्ये एकूण 4-5% पर्यंत वाढ करण्यात आली आहे. आता आणखी एका वाढीचा विचार सुरू असून ती पुढील महिन्यात लागू होण्याची शक्यता आहे.

नवी BMW 7 Series आणि i7 भारतात लाँच! किंमत ₹1.95 कोटींपासून सुरु; पाहा या लक्झरी गाडीचे फीचर्स आणि इंटेरियर

ब्रार यांच्या मते, गेल्या वर्षी जानेवारीपासून रुपयाच्या तुलनेत संबंधित परकीय चलनातील स्थिती सुमारे 18% प्रतिकूल झाली आहे. त्यामुळे आयात केलेल्या वाहनांची किंमत आणि कंपनीचा खर्च वाढत आहे. कमोडिटीच्या वाढत्या किमतींचाही या निर्णयावर परिणाम होत आहे. परिणामी, आगामी किंमतवाढीचा थेट परिणाम ग्राहकांच्या खरेदी बजेटवर होऊ शकतो.

दरम्यान, कंपनीने भारतात नवीन BMW 7 सीरिज देखील सादर केली आहे. या फ्लॅगशिप सेडानमध्ये पेट्रोल तसेच पूर्णपणे इलेक्ट्रिक ऑप्शन उपलब्ध आहेत. नवीन BMW i7 चे उत्पादन चेन्नईतील BMW ग्रुपच्या प्लांटमध्ये स्थानिक पातळीवर केले जाणार आहे. त्यामुळे जर्मनीनंतर भारत हे i7 चे स्थानिक उत्पादन करणारा दुसरा देश ठरला आहे.

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!

नवीन 7 सीरिजसाठी बुकिंग BMW इंडियाच्या डीलरशिपवर सुरू असून डिलिव्हरी ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार आहे. BMW 740 M Sport आणि BMW i7 eDrive 50 xDrive M Sport यांची एक्स-शोरूम किंमत प्रत्येकी ₹1.95 कोटी आहे, तर BMW i7 M70 xDrive ची किंमत ₹2.65 कोटी आहे. मात्र येत्या किंमतवाढीमुळे या मॉडेल्ससह इतर कारच्या किमती आणखी वाढू शकतात.

Web Title: Bmw india to increase car prices again due rupee fall auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • automobile
  • BMW
  • cars
  • Price Hike

संबंधित बातम्या

Audi Comeback Plan: ऑडी इंडियाचा कमबॅक प्लॅन! नव्या कार, EV आणि 40 शोरूम्सवर देणार जास्त भर
1

Audi Comeback Plan: ऑडी इंडियाचा कमबॅक प्लॅन! नव्या कार, EV आणि 40 शोरूम्सवर देणार जास्त भर

भारतात Hero E85 फ्लेक्स-फ्यूल बाईक्सच्या १०,००० बुकिंग पूर्ण! जाणून घ्या डिटेल मध्ये
2

भारतात Hero E85 फ्लेक्स-फ्यूल बाईक्सच्या १०,००० बुकिंग पूर्ण! जाणून घ्या डिटेल मध्ये

हिरो ग्लॅमर X ABS लाँच; 125cc बाइकमध्ये मिळणार हे खास सेफ्टी फीचर! जाणून घ्या सर्व माहिती
3

हिरो ग्लॅमर X ABS लाँच; 125cc बाइकमध्ये मिळणार हे खास सेफ्टी फीचर! जाणून घ्या सर्व माहिती

2027 Kawasaki Versys 1100 भारतात लाँच, किंमत ₹13.89 लाख; जाणून घ्या खास फीचर्स
4

2027 Kawasaki Versys 1100 भारतात लाँच, किंमत ₹13.89 लाख; जाणून घ्या खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.