फोटो सौजन्य: Pinterest
BMW ने भारतात आपली नवीन M2 CS ही परफॉर्मन्स कार सादर केली आहे. ही कार उच्च दर्जाचे इंजिन आणि प्रीमियम फीचर्ससह बाजारात आणण्यात आली आहे.
या कारमध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यात एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, 19 आणि 20 इंचांचे अलॉय व्हील्स, ड्युअल एग्झॉस्ट सिस्टीम, कार्बन-फायबर-रीइन्फोर्स्ड प्लास्टिकचे काही भाग, प्रीमियम इंटीरियर, 12.3 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 14.9 इंच कर्व्ह्ड इन्फोटेनमेंट सिस्टीम, 14 स्पीकर ऑडिओ सिस्टीम, ॲम्बिएंट लाइटिंग, सहा एअरबॅग्स, ABS, EBD, क्रूझ कंट्रोल आणि ISOFIX चाइल्ड अँकरेज यांसारखे अनेक फीचर्स समाविष्ट आहेत.
या कारमध्ये 3.0 लिटर क्षमतेचे इंजिन देण्यात आले असून ते 530 हॉर्सपॉवर आणि 650 Nm टॉर्क निर्माण करते. ही कार फक्त 3.8 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठू शकते. M ड्रायव्हर पॅकेजसह या कारचा कमाल वेग 302 किमी प्रतितास इतका आहे.
BMW ग्रुप इंडियाचे अध्यक्ष आणि CEO Hardeep Singh Brar यांनी सांगितले की, BMW M2 CS ही कार अत्युच्च रोमांचक ड्रायव्हिंग अनुभवासाठी तयार करण्यात आली आहे. ही कार जरी रेसट्रॅकसाठी डिझाइन केलेली असली तरी ती कोणत्याही रस्त्यावर उत्कृष्ट परफॉर्मन्स देण्यासाठी सक्षम आहे.
काय मॉडेल काय फीचर्स सगळं एकदम झकास; BYD Sealion 7 चं स्पेशल एडिशन लॉन्च
भारतात BMW च्या कार्स त्यांच्या महागड्या किमतीमुळे देखील ओळखल्या जातात. एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.66 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.






