Schaeffler Announces Major European Job Cuts (फोटो सौजन्य-AI एआय)
फोक्सवॅगनला सुटे भाग पुरवणारी जर्मनीची कंपनी शेफलर (Schaeffler) आर्थिक अडचणींमुळे मोठा निर्णय घेणार आहे. कंपनी युरोपमधील 3,460 कर्मचाऱ्यांची कपात करणार असून 5 प्रोडक्शन साइट्स बंद करणार आहे. Schaeffler Job Cuts 2026 या निर्णयामागे वाहनांची कमी झालेली मागणी, चीनमधील कंपन्यांकडून वाढलेली स्पर्धा आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे होणारे संथ संक्रमण ही कारणे आहेत. हा बदल 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे कंपनीचे नियोजन आहे.
शेफलरच्या घोषणेनुसार, बंद होणाऱ्या 5 साइट्सपैकी 4 जर्मनीमध्ये, तर 1 बेल्जियममध्ये आहे. एकूण कर्मचाऱ्यांच्या कपातीपैकी जवळपास 75% कपात जर्मनीत होणार आहे. कंपनी सध्या जगभरात जवळपास 1.09 लाख लोकांना रोजगार देते. जर्मनीतील 31,957 कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 9% पदे कमी केली जाणार आहेत. 2024 मधील कपातीसह जर्मनीतील कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 18% ने कमी होईल.
फोक्सवॅगनची नवीन कॉम्पॅक्ट SUV 2027 मध्ये येणार! स्कोडा कायलॅकच्या प्लॅटफॉर्मवर होणार निर्मिती
शेफलर बेअरिंग्ज आणि हायब्रीड-इलेक्ट्रिक ड्राइव्हट्रेनसारखे वाहनांचे सुटे भाग तयार करते. कंपनी जनरल मोटर्स आणि बीएमडब्ल्यूसारख्या वाहन कंपन्यांनाही पुरवठा करते. पेट्रोल-डिझेल वाहनांची मागणी कमी होत असताना इलेक्ट्रिक वाहनांचे प्रोडक्शन अपेक्षित वेगाने वाढलेले नाही. त्यात चीनमधील उत्पादकांकडून कमी किमतीत स्पर्धा मिळत आहे. जर्मनीतील कर्मचाऱ्यांवरील खर्च हा युरोपमधील इतर भागांच्या तुलनेत जवळपास अडीच पट असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
या कपातीमुळे 2030 पासून दरवर्षी सुमारे 300 दशलक्ष युरोची बचत होण्याची अपेक्षा आहे. पण पुनर्रचनेसाठी कंपनीला एकदाच 480 दशलक्ष युरो खर्च करावे लागतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मूळ पगारात 10% कपात केली जाणार असून व्यवस्थापनाचे 2 स्तर कमी करण्याचीही योजना आहे. संशोधन आणि विकासावरील खर्चासोबत जास्तीची प्रोडक्शन कॅपसिटी कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.
याआधी नोव्हेंबर 2024 मध्ये कंपनीने युरोपमध्ये 4,700 नोकऱ्या कमी करण्याची योजना जाहीर केली होती. त्यातून 2029 पर्यंत दरवर्षी 290 दशलक्ष युरो वाचवण्याचे उद्दिष्ट होते. आता शेफलर ह्युमनॉइड रोबोट्स आणि संरक्षण क्षेत्रासाठी लागणारे सुटे भाग तयार करण्यासारख्या नव्या व्यवसायांमध्येही संधी शोधत आहे. त्यामुळे कंपनी वाहन उद्योगावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
Ans: शेफलर युरोपमध्ये एकूण 3,460 कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. ही प्रक्रिया 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
Ans: कंपनी युरोपमधील 5 प्रोडक्शन साइट्स बंद करणार आहे. यापैकी 4 साइट्स जर्मनीमध्ये आणि 1 बेल्जियममध्ये आहे.
Ans: वाहनांची कमी झालेली मागणी, चीनमधील कंपन्यांकडून वाढलेली स्पर्धा, इलेक्ट्रिक वाहनांकडे होणारे संथ संक्रमण आणि जर्मनीतील जास्त उत्पादन खर्च ही या निर्णयामागील कारणे आहेत.






