Side Effects Of Drinking Tea
चहामध्ये टॅनिन आणि पॉलीफेनॉल नावाची संयुगे असतात, जी नॉन-हीम आयरनचे शोषण कमी करू शकतात. चहा प्यायल्यानंतर लगेच आयरनयुक्त पदार्थ खाल्ल्याने शरीराच्या आयरन शोषणात अडथळा येऊ शकतो. यामुळे, ॲनिमिया किंवा लोहाच्या कमतरतेने ग्रस्त असलेल्या लोकांनी विशेष खबरदारी घ्यावी.
जर तुम्ही पालक, मसूर, चणे, राजमा आणि हिरव्या भाज्या खात असाल, तर त्यानंतर लगेच चहा प्यायल्याने आयरनचे शोषण कमी होऊ शकते. म्हणून, संपूर्ण पौष्टिक लाभ मिळवण्यासाठी, चहा आणि आयरनयुक्त पदार्थांमध्ये अंतर ठेवणे उत्तम आहे.
चहामधील कॅफीनमुळे काही लोकांना अॅसिडिटी, छातीत जळजळ किंवा अस्वस्थता जाणवू शकते. जर तुम्हाला आधीपासूनच ॲसिड रिफ्लक्स किंवा गॅसचा त्रास असेल, तर चहा आणि जेवणाच्या वेळेकडे लक्ष देणे जास्त महत्त्वाचे आहे.
चहामध्ये कॅफीन असते. जास्त चहा प्यायल्याने काही लोकांना अस्वस्थ वाटू शकते. याशिवाय झोप न येण्याचा त्रास होऊ शकतो आणि हृदयाचे ठोके वाढू शकतात. त्यामुळे, दिवसभरात जास्त चहा पिणे टाळा.
Ans: चहा प्यायल्यानंतर लगेच जेवण करणे शक्यतो टाळावे. चहामधील टॅनिन आणि पॉलीफेनॉलमुळे जेवणातील लोहाच्या शोषणावर परिणाम होऊ शकतो.
Ans: जेवणानंतर किमान १ तासाने चहा पिणे चांगले मनाले जाते. विशेषतः लोहाची कमतरता असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Ans: जेवणाच्या अगदी आधी चहा पिणे टाळावे. चहामधील कॅफीनमुळे काही लोकांना अॅसिडिटी किंवा पोटात अस्वस्थता जाणवू शकते.






