फोटो सौजन्य: @OtsileJK(X.com)
भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम कार उपलब्ध आहे. बदलत्या वेळेनुसार, ग्राहकांची मागणी बदलत आहे. हीच मागणी लक्षात घेता अनेक ऑटो कंपन्या अत्याधुनिक फीचर्ससह बेस्ट कार मार्केटमध्ये ऑफर करत आहे. यातीलच एक कंपनी म्हणजे टोयोटा.
जपानमधील आघाडीची ऑटोमोबाइल उत्पादक कंपनी, टोयोटाने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. Toyota Fortuner तर एक वेगळाच चाहता वर्ग आहे. जर तुम्ही भारतात Land Cruiser सारखी शक्तिशाली एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर टोयोटाने त्यासाठी बुकिंग सुरू केली आहे. ही कार कोणत्या किमतीत खरेदी करता येईल? त्यात कोणत्या प्रकारचे फीचर्स आणि इंजिन दिले जात आहे. याची डिलिव्हरी कधीपर्यंत सुरू होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.
तरुणांची ‘ही’ आवडती बाईक नव्याने झाली लाँच, किंमत 1.56 लाखांपासून सुरु
टोयोटाने ऑफर केलेल्या लँड क्रूझर 300 एसयूव्हीचे बुकिंग सुरू झाले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यासाठी 19 फेब्रुवारीपासून बुकिंग सुरू झाली आहे.
टोयोटा तिच्या लँड क्रूझर 300 एसयूव्हीमध्ये एलईडी हेडलाइट्स, एलईडी टेल लॅम्प, सीक्वेंशियल टर्न इंडिकेटर, फ्रंट आणि रिअर फॉग लॅम्प, हीटेड, अँटी-ग्लेअर रिअर व्ह्यू आउटसाइड मिरर, इल्युमिनेटेड साइड स्टेप्स, सनरूफ, फ्रंट आणि रिअर सीट व्हेंटिलेशन आणि हीटिंग, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, पाच ड्रायव्हिंग मोड्स, स्मार्ट एंट्री सिस्टम, हायड्रॉलिक पॉवर स्टीअरिंग, 8-वे पॉवर अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स, हेड-अप डिस्प्ले, वायरलेस चार्जर, फोर झोन क्लायमेट कंट्रोल, 31.24 सेमी इन्फोटेनमेंट सिस्टम, 14 स्पीकर ऑडिओ सिस्टम, अॅपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, रिअर सीट एंटरटेनमेंट, अॅडॉप्टिव्ह व्हेरिएबल सस्पेंशन, क्रॉल कंट्रोल, डाउनहिल असिस्ट कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, मल्टी-टेरेन सिलेक्ट, 4 कॅमेरा पॅनोरॅमिक व्ह्यू, अॅक्टिव्ह ट्रॅक्शन कंट्रोल अशी फीचर्स देते.
कंपनीने या एसयूव्हीमध्ये टोयोटा सेफ्टी सेन्स, पीसीएस, एलडीए, डीआरसीसी, एलटीए, एएचएस, इमोबिलायझर, 10 एअरबॅग्ज, 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा, चारही चाकांवर डिस्क ब्रेक, थ्री पॉइंट सीटबेल्ट, 2 चाइल्ड रिस्ट्रेंट सिस्टम, पार्किंग सेन्सर, अँटी-स्लिप ब्रेकिंग सिस्टम, क्रॉल कंट्रोल आणि टर्न असिस्ट, डाउनहिल असिस्ट कंट्रोल, टीपीएमएस सारखी सेफ्टी फीचर्स दिली आहेत.
कंपनी टोयोटा लँड क्रूझर 300 मध्ये V6 इंजिन प्रदान करते. ज्यामुळे एसयूव्हीला 304 बीएचपीची पॉवर आणि 700 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. यात 10-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. ऑल व्हील ड्राइव्ह तंत्रज्ञान देखील उपलब्ध आहे.
टोयोटा लँड क्रूझर 300 दोन व्हेरियंटमध्ये देते. यामध्ये, ZX व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 2.31 कोटी रुपये आहे. GR-S व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 2.41 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.
टोयोटाने या एसयूव्हीची बुकिंग नुकतीच सुरू केली आहे. त्याची डिलिव्हरी कधी सुरू होईल याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. पण अशी अशा आहे की या कारची डिलिव्हरी एप्रिल 2025 च्या आसपास सुरू होऊ शकते.