फोटो सौजन्य: Social Media
भारतीय मार्केटमध्ये अनेक कार नव्याने अपडेट होऊन पुन्हा लाँच होत आहे. या कारला ग्राहक देखील चांगला प्रतिसाद देत आहे. मारुती सुझुकीने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. आता कंपनीने नुकतेच मारुती ब्रेझाला अलीकडेच स्टॅंडर्ड सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्जसह अपडेट करण्यात आले आहे. त्यामुळे आता ही कार प्रवाशांना अधिक सुरक्षित ड्रायव्हिंगचा अनुभव देणार आहे. मार्केटमध्ये मारुती ब्रेझा थेट टाटा नेक्सॉनसोबत स्पर्धा करत असते.
मारुती ब्रेझा आणि टाटा नेक्सॉन या दोन्ही कार १० लाख रुपयांच्या बजेटमध्ये येतात. जर तुम्ही या दोन्ही कारपैकी कोणतीही एक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. 10 लाखांच्या बजेटमध्ये या दोन्ही कारपैकी सर्वात चांगली कार कोणती? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
भारतीय बाजारात, टाटा नेक्सॉनची किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 15.80 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. त्याच वेळी, प्राइस रेंज अपडेट केल्यानंतर, तुम्ही मारुती ब्रेझाचा बेस व्हेरियंट 8.69 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करू शकता. तेच याचा टॉप व्हेरियंट 14.14 लाखांपर्यंत जाते.
टोयोटा EV सेगमेंटमध्ये 7 Seater MPV आणायच्या तयारीत, पण भारतात होणार का लाँच?
ग्लोबल एनसीएपी कडून क्रॅश टेस्टमध्ये टाटा नेक्सॉनला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. तर मारुती ब्रेझाला 4-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. टाटा नेक्सॉनमध्ये 382 लिटरची बूट स्पेस आहे. दुसरीकडे, ब्रेझाची बूट स्पेस 328 लिटर आहे.
मारुती ब्रेझा 1.5-लिटर पेट्रोल आणि सीएनजी पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हे इंजिन 102 बीएचपीची पॉवर आणि 137 एनएम टॉर्क जनरेट करते. सीएनजीसह, ही पॉवरट्रेन 88PS पॉवर आणि 121.5 एनएम टॉर्क जनरेट करते.
मायलेजबद्दल बोलायचे झाले तर, ब्रेझा पेट्रोल इंधनासह 20 किमी प्रति लिटर आणि सीएनजी इंधनासह 26 Km/kg पर्यंतचा मायलेज देऊ शकते. तर टाटा नेक्सॉन 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल, 1.5-लिटर डिझेल इंजिन आणि सीएनजी पॉवरट्रेनच्या पर्यायांसह उपलब्ध आहे. ही एसयूव्ही इंजिन आणि व्हेरियंटनुसार १७ ते २४ किमी प्रति लिटर मायलेज देते.
टाटा नेक्सॉन ही हायब्रिड कार नाही. पण ही कार पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी या तिन्ही पॉवरट्रेनच्या पर्यायांसह येते. टाटाची ही कार 1.2-लिटर टर्बोचार्ज्ड रेव्होट्रॉन इंजिनने सुसज्ज आहे. हे इंजिन 5,500 आरपीएम वर 88.2 पीएस पॉवर आणि 1,750 ते 4,000 आरपीएम वर 170 एनएम टॉर्क निर्माण करते. टाटा नेक्सॉन 17 ते 24 किमी प्रति लिटर मायलेज देते.
एलोन मस्क आणि पंतप्रधान मोदींची भेट, आता Tesla च्या ‘या’ कार भारतात एंट्री मारण्यास सज्ज?
टाटा नेक्सॉनमध्ये 10.25 -इंच टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस चार्जर, व्हेंटिलेटेड आणि उंची-अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स, क्रूझ कंट्रोल, ९-स्पीकर जेबीएल साउंड सिस्टम, व्हॉइस-असिस्टेड आणि इलेक्ट्रिक सनरूफ सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
त्याच वेळी, मारुती ब्रेझामध्ये 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 4-स्पीकर, पॅडल शिफ्टर्स, सनरूफ, अँबियंट लाइटिंग, वायरलेस फोन चार्जर, हेड-अप डिस्प्ले सारखी फीचर्स उपलब्ध आहेत. ब्रेझामध्ये 328 लिटरची बूट स्पेस आहे.