Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नैसर्गिक वायू वापराला गती देण्यासाठी बीपीसीएल सज्ज! राष्ट्रीय स्तरावर ‘पीएनजी व सीएनजी ड्राइव्ह २.०’ची घोषणा

बीपीसीएलकडून राष्ट्रीय पीएनजी व सीएनजी ड्राइव्ह 2.0 ची घोषणा करण्यात आली आहे. तसेच ‘नॉन-स्टॉप जिंदगी’ या त्यांच्या मोहिमेतून ते स्वच्छ ऊर्जेचा संदेश देत आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 21, 2026 | 09:05 PM
नैसर्गिक वायू वापराला गती देण्यासाठी बीपीसीएल सज्ज!

नैसर्गिक वायू वापराला गती देण्यासाठी बीपीसीएल सज्ज!

Follow Us
Follow Us:
  • बीपीसीएलकडून राष्ट्रीय पीएनजी व सीएनजी ड्राइव्ह 2.0 ची घोषणा
  • स्वच्छ ऊर्जेचा संदेश देण्याचा प्रयत्न
  • हा उपक्रम भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला गती देणारा
फॉर्च्युन ग्लोबल 500 यादीतील आणि महारत्न दर्जा प्राप्त सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने देशभरात पीएनजी व सीएनजी ड्राइव्ह 2.0 या राष्ट्रीय स्तरावरील जनजागृती उपक्रमाची घोषणा केली आहे. हा उपक्रम भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला गती देणारा असून, ऊर्जा मिश्रणात नैसर्गिक वायूचा वाटा वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे.

या उपक्रमांतर्गत पीएनजी ड्राइव्ह 2.0 ची दूरदर्शन जाहिरात मोहीम राष्ट्रीय स्तरावर सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियामक मंडळ (PNGRB) आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात असून, देशातील सर्व शहर वायू वितरण (CGD) कंपन्यांचा यात सहभाग आहे. ही जनजागृती मोहीम 1 जानेवारी ते 31 मार्च 2026 या कालावधीत राबवली जाणार आहे.

या मोहिमेसाठी अभिनेता व खासदार रवी किशन सीएनजीचा, तर अभिनेत्री साक्षी तन्वर पीएनजीचा प्रचार करताना दिसणार आहेत. या जाहिरातींमधून नैसर्गिक वायूची सुरक्षितता, परवडणारी किंमत, वापरण्यातील सोय आणि पर्यावरणपूरक फायदे अधोरेखित करण्यात आले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने खरेदी केली ‘या’ दोन आलिशान कार, किंमत वाचाल तर धडकीच भरेल

बीपीसीएलचे विपणन संचालक शुभंकर सेन यांनी सांगितले की, “पीएनजी व सीएनजी ड्राइव्ह 2.0 हा राष्ट्रनिर्मितीच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे. नैसर्गिक वायू स्वयंपाकघरापासून ते वाहतुकीपर्यंत सुरक्षित, विश्वासार्ह आणि अखंड ऊर्जा पुरवतो, तसेच कार्बन उत्सर्जनात मोठी घट घडवून आणतो.”

‘नॉन-स्टॉप जिंदगी’ ही संकल्पना घरगुती, व्यावसायिक आणि वाहतूक क्षेत्रासाठी नैसर्गिक वायूला चिंता-मुक्त इंधन म्हणून सादर करते. पीएनजीमुळे सिलिंडर रिफिलची गरज संपते, तर सीएनजी स्वच्छ आणि कार्यक्षम मोबिलिटीला प्रोत्साहन देते.

बीपीसीएलचे व्यवसाय प्रमुख (वायू) राहुल टंडन यांनी हा उपक्रम सार्वजनिक व खासगी सीजीडी कंपन्यांमधील अखिल भारतीय सहकार्याचे प्रतीक असल्याचे सांगितले. “नैसर्गिक वायू हा केवळ इंधन नसून जीवन सुलभ करणारा घटक आहे. 2070 पर्यंत नेट-झिरो उद्दिष्ट साध्य करण्यास हा उपक्रम मदत करेल,” असे त्यांनी नमूद केले.

Vinfast VF6 आणि VF7 ची झाली क्रॅश टेस्ट ! जाणून घ्या किती सुरक्षित आहेत ‘या’ कार

महानगर गॅस लिमिटेडच्या महाव्यवस्थापिका नीरा अस्थाना फाटे यांनी सांगितले की, पीएनजी आणि सीएनजीमुळे स्वच्छ जीवनशैली आणि स्वच्छ वाहतूक शक्य होते. जनतेपर्यंत प्रभावी संवाद साधणे ही या मोहिमेची प्रमुख ताकद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गेल्या दशकात भारतातील शहर वायू वितरण पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 2014 मध्ये 25–30 भौगोलिक क्षेत्रांपुरते मर्यादित असलेले जाळे आता 307 क्षेत्रांपर्यंत विस्तारले आहे. 2034 पर्यंत 12.64 कोटी पीएनजी घरगुती जोडण्या आणि 18,336 सीएनजी स्टेशन उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या देशात 1.61 कोटी पीएनजी जोडण्या आणि 8,500 हून अधिक सीएनजी स्टेशन कार्यरत आहेत.

बीपीसीएलने स्पष्ट केले की, शहर वायू वितरण कंपन्यांच्या सहकार्याने पीएनजी व सीएनजीचा स्वीकार वाढवून भारतासाठी अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि शाश्वत ऊर्जा भविष्यास चालना देणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

 

Web Title: Bpcl announces national png and cng drive 20 for clean energy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 09:05 PM

Topics:  

  • automobile
  • CNG

संबंधित बातम्या

महिंद्राच्या ‘या’ मार्केटिंग कँपेनने बदलला होता भारतीय ईव्ही मार्केटचा चेहरा! महिंद्राची ‘अनलिमिट भारत’ मोहीम
1

महिंद्राच्या ‘या’ मार्केटिंग कँपेनने बदलला होता भारतीय ईव्ही मार्केटचा चेहरा! महिंद्राची ‘अनलिमिट भारत’ मोहीम

इन्फ्लुएन्सर्सच्या एका व्हिडिओने बदलतोय भारतीय ग्राहकांचा निर्णय! ऑटोमोबाईल क्षेत्रावर वाढतोय कंटेंटचा प्रभाव!
2

इन्फ्लुएन्सर्सच्या एका व्हिडिओने बदलतोय भारतीय ग्राहकांचा निर्णय! ऑटोमोबाईल क्षेत्रावर वाढतोय कंटेंटचा प्रभाव!

Black-White च्या रंगांत हरवतेय का ऑटोमोबाईलची दुनिया? विविध रंगी गाड्या होतायत इतिहासजमा
3

Black-White च्या रंगांत हरवतेय का ऑटोमोबाईलची दुनिया? विविध रंगी गाड्या होतायत इतिहासजमा

या आहेत जगातल्या 10 सर्वात जुन्या इंजिनच्या कार : Top 10 Oldest Engine Cars In World
4

या आहेत जगातल्या 10 सर्वात जुन्या इंजिनच्या कार : Top 10 Oldest Engine Cars In World

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.