फोटो सौजन्य: Instagram
रिपोर्टनुसार, तिने सुमारे 11 कोटी रुपये किंमतीची Rolls-Royce Cullinan आणि जवळपास 5 कोटी रुपयांची Green Mercedes-Benz G-Wagon खरेदी केली आहे. या दोन्ही कार्सची एकूण किंमत सुमारे 16 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. चला, या लक्झरी कार्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Honda वाहनधारकांनो लक्ष द्या! कंपनीच्या ‘या’ 2 बाईकमध्ये आली खराबी! जारी झाला रिकॉल
पांढऱ्या रंगाच्या Rolls-Royce Cullinan आणि ग्रीन रंगाच्या G-Wagon सोबत उर्वशी रौतेलाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. याच्या नव्या कार कलेक्शनचे चाहते भरभरून कौतुक करत आहेत. अनेकांनी ही तिच्या मेहनत आणि चिकाटीचे फळ असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी तिच्या आयुष्याला “ड्रीम लाइफ” अशी उपमा दिली आहे. दोन्ही कार्सचे कलर कॉम्बिनेशही विशेष लक्ष वेधून घेत असून, लक्झरी आणि बोल्ड स्टाइलचा उत्तम संगम यातून दिसून येतो.
Tata Sierra खरेदी करण्याआधी ‘हे’ गुपित तुम्हाला ठाऊक हवंच! चुकीचा निर्णय ठरू शकतो महागात
Rolls-Royce Cullinan ही जगातील सर्वात लक्झरी SUV पैकी एक मानली जाते. या कारमध्ये आरामदायी प्रवास, अत्याधुनिक लक्झरी फीचर्स, कोच डोअर्स, स्प्लिट टेलगेट, अतिशय भव्य केबिन आणि ऑफ-रोड क्षमतेचा उत्तम मिलाफ आहे. दुसरीकडे, Mercedes-Benz G-Wagon ही तिच्या मजबूत बॉडी, दमदार ऑफ-रोड क्षमता, आयकॉनिक डिझाइन आणि खासकरून शक्तिशाली AMG V8 इंजिनमुळे ओळखली जाते. Cullinan ही पूर्णपणे अल्ट्रा-लक्झरी SUV असताना, G-Wagon ही पॉवर आणि रफ-टफ लक्झरीची ओळख आहे.






