फोटो सौजन्य: Pinterest
व्हिएतनामची ऑटो कंपनी विनफास्टने देखील भारतात त्यांच्या दोन इलेक्ट्रिक कार ऑफर केल्या आहेत. VinFast VF6 आणि VF7 कंपनीकडून ऑफर केली जाते. या दोन्ही कार्सची नुकतीच BNCAP ने क्रॅश टेस्ट केली. चला जाणून घेऊयात, या दोन्ही इलेक्ट्रिक SUV किती सुरक्षित आहेत?
BNCAP कडून करण्यात आलेल्या क्रॅश टेस्टनंतर जाहीर झालेल्या अहवालानुसार या दोन्ही SUV ना सुरक्षेसाठी पूर्ण 5 स्टार रेटिंग देण्यात आली आहे. प्रौढ प्रवासी तसेच मुलांच्या सुरक्षेसाठीही या दोन्ही SUV ला पूर्ण गुण मिळाले आहेत.
Tata Sierra खरेदी करण्याआधी ‘हे’ गुपित तुम्हाला ठाऊक हवंच! चुकीचा निर्णय ठरू शकतो महागात
भारत NCAP कडून करण्यात आलेल्या क्रॅश टेस्टमध्ये VF6 SUV ला फ्रंटल टेस्टमध्ये 11.13 तर साइड मूवेबल टेस्टमध्ये 16 गुण मिळाले आहेत. यामुळे या SUV ला एकूण 32 पैकी 27.13 गुण प्राप्त झाले आहेत.
तर VF7 SUV ला फ्रंटल टेस्टमध्ये 12.54 आणि साइड मूवेबल टेस्टमध्ये 16 गुण मिळाले आहेत. त्यामुळे या SUV ला एकूण 32 पैकी 28.54 गुण मिळाले आहेत.
याच टेस्टमध्ये मुलांच्या सुरक्षेचाही आढावा घेण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार VF6 ला डायनॅमिक स्कोअरमध्ये 22.41, CRS इन्स्टॉलेशनमध्ये 12 आणि VAS टेस्टमध्ये 10 गुण मिळाले आहेत. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेसाठी या SUVला 49 पैकी 44.41 गुण मिळाले आहेत.
तर VF7 ला डायनॅमिक स्कोअरमध्ये 23.25, CRS इन्स्टॉलेशनमध्ये 12 आणि VAS टेस्टमध्ये 10 गुण मिळाले असून, मुलांच्या सुरक्षेसाठी या SUVला 49 पैकी 45.25 गुण देण्यात आले आहेत.
भारत NCAP कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या दोन्ही SUVच्या क्रॅश टेस्ट नोव्हेंबर 2025 मध्ये करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता या टेस्टचे निकाल अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहेत.






