फोटो सौजन्य: iStock
भारतात नेहमीच उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या बाईक्सला चांगली मागणी मिळते. यातही जर तिचा लूक स्टायलिश असेल तर मग नक्कीच तरुणांना त्या बाईकची भुरळ पडते. अशीच एक अफलातून बाईक म्हणजे Royal Enfield Hunter 350.
आपल्याकडे रॉयल एन्फिल्डची बाईक असावी असे अनेक जणांचे स्वप्न असते. मात्र, कंपनीच्या बाईकची किंमत थोडी महाग असल्याने आणि त्यात पगार कमी असल्याने अनेकांचे बाईक खरेदीचे स्वप्न भंगते. मात्र, जर तुमचा पगार 25 हजार असेल तर नक्कीच तुम्ही रॉयल एनफील्ड हंटर 350 घरी आणू शकतात. कसे? चला जाणून घेऊयात.
सर्वात स्वस्त Toyota Fortuner खरेदी करण्यासाठी किती करावा डाउन पेमेंट?
भारतीय बाजारपेठेत रॉयल एनफील्डच्या बाईक्सला मोठी मागणी आहे, आणि त्यामध्ये हंटर ३५० ही तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. जर तुम्हीही हंटर 350 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या पगार आणि बजेटनुसार ती परवडेल का हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
रॉयल एनफील्ड हंटर 350 ची एक्स-शोरूम किंमत ₹1,49,900 पासून सुरू होते. ही बाईक संपूर्ण रक्कम देऊन खरेदी करण्याची गरज नाही, कारण ती लोनवर देखील घेता येते. दिल्लीतील बेस मॉडेल ‘रेट्रो फॅक्टरी’ची ऑन-रोड किंमत सुमारे ₹1.73 लाख आहे. लोनवर खरेदी करताना तुम्हाला ₹1.64 लाखांचे लोन मिळेल, तर फक्त ₹8,646 डाउन पेमेंट करावे लागेल.
25000 च्या मासिक पगारात इतर खर्च काढल्यानंतर बचत शक्य असेल, तर हंटर 350 खरेदी करणे तुमच्यासाठी सोयीचे ठरू शकते.
रॉयल एनफील्ड हंटर 350 मध्ये 349 सीसी, सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक इंजिन असून ते 20.2 बीएचपी पॉवर आणि 27 एनएम टॉर्क निर्माण करते. यात 5-स्पीड गिअरबॉक्स, 13 लिटरची इंधन टाकी आणि सुमारे 36.2 किमी प्रतिलिटर मायलेज आहे, जे शहरात आणि हायवेवर दोन्ही ठिकाणी चांगली रेंज देते.
Citroen Aircross चा स्पेशल अवतार लवकरच मार्केटमध्ये होणार लाँच, मिळणार ताबडतोड फीचर्स
योग्य कर्ज मुदत आणि डाउन पेमेंट निवडल्यास, रॉयल एनफील्ड हंटर 350 तुमच्या बजेटमध्ये सहज बसू शकते आणि तुम्हाला एक दमदार रायडिंग अनुभव देऊ शकते.