फोटो सौजन्य: X.com
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. हीच मागणी, अन्य ऑटो कंपन्यांना भारतात आपल्या उत्तमोत्तम कार लाँच करण्यास प्रोत्साहित करते. म्हणूनच देशातील ऑटोबाजारात विविध कंपन्या कार्यरत आहेत. अशीच एक कंपनी म्हणजे Citroen. ही एक फ्रेंच ऑटो कंपनी आहे, जी भारतात अनेक वर्षांपासून कार ऑफर करत आहे.
एसयूव्ही सेगमेंटमध्ये ऑफर केल्या जाणाऱ्या Citroen Aircross चे फेसलिफ्ट मॉडेल लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही एसयूव्ही अलीकडेच टेस्टिंग दरम्यान दिसली आहे. या काळात एसयूव्हीबद्दल कोणती माहिती समोर आली आहे. त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
सिट्रोएन लवकरच त्यांच्या एसयूव्ही एअरक्रॉसचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करण्याची तयारी करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही एसयूव्ही लाँच होण्यापूर्वी त्याची टेस्टिंग केली जात आहे. नुकतेच या कारला स्पॉट सुद्धा करण्यात आले आहे.
चेन्नईतील प्लांटजवळ टेस्टिंग दरम्यान सिट्रोएन एअरक्रॉस दिसली. ज्यामध्ये पुढचा लोगो, मागील खिडकी तसेच आतील भाग झाकलेला होता. ज्यावरून असे सांगितले जात आहे की ते नवीन डॅशबोर्ड, नवीन इंटिरिअर आणि लोगोमध्ये बदलांसह ही कार लाँच केली जाईल.
रिपोर्ट्सनुसार, एसयूव्हीच्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये फक्त फीचर्स आणि इंटिरिअर बदलले जातील. त्याच्या बेसिक डिझाइन आणि इंजिनमध्ये कोणताही बदल होणार नाही.
या SUV च्यालाँचिंगबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु अशी अपेक्षा आहे की ही एसयूव्ही भारतात सणासुदीच्या हंगामात लाँच केली जाऊ शकते. यासोबतच, त्याची किंमत देखील थोडी वाढवता येईल. सध्या, ही एसयूव्ही भारतीय बाजारात 8.62 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीपासून 14.60 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीदरम्यान विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जात आहे.
सिट्रोएनने एअरक्रॉस ही कार आधी C3 एअरक्रॉस म्हणून विक्रीसाठी उपलब्ध करून दिली होती. मात्र, काही काळापूर्वी याचे नाव C3 वरून फक्त एअरक्रॉस असे बदलण्यात आले. ही एसयूव्ही भारतातील मिड साइझ एसयूव्ही सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. या सेगमेंटमध्ये, ही कार किआ सेल्टोस, ह्युंदाई क्रेटा, होंडा एलिव्हेट, फोक्सवॅगन टायगुन सारख्या मिड साइझ एसयूव्हीशी थेट स्पर्धा करेल.