Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ 4 घोडचुका टाळाच ! अन्यथा तुमच्या नजरेसमोरच तुमची कार होईल भस्मसात

कार खरेदी केल्यानंतर अनेक जण त्याच्या मेंटेनन्सकडे जास्त लक्ष देत नाही. यामुळे कार मालकांना अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यात तुम्ही काही चुका टाळणे फार महत्वाचे आहे.

  • By मयुर नवले
Updated On: May 25, 2025 | 05:39 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

ड्रीम कार खरेदी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. नवीन कार घेतल्यावर बरेच जण तिची काळजी घेतात, वेळेवर सर्व्हिस करतात. पण जसजशी कार जुनी होते, तसतसे तिच्याकडे दुर्लक्ष होऊ लागते. हे दुर्लक्ष कारच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकते. विशेषतः उन्हाळा किंवा पावसाळा यांसारख्या हवामानात कारची अधिक काळजी घेणे गरजेचे असते. उष्णतेमुळे इंजिन गरम होऊ शकते, तर पावसामुळे इलेक्ट्रिकल सिस्टीम आणि ब्रेकवर परिणाम होऊ शकतो. म्हणून नियमित देखभाल, टायर प्रेशर तपासणी, ब्रेक ऑइल, वायपर आणि एसी सिस्टमची तपासणी करणे अत्यावश्यक आहे. त्यासोबतच काही चुका टाळणे देखील महत्वाचे आहे.

उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेता तशीच तुम्हाला तुमच्या कारचीही काळजी घ्यावी लागेल. मात्र, कधीकधी लोक काही लहान चुका करतात ज्यामुळे कारचे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच कारला आग लागण्याचा धोकाही वाढतो. हीच बाब लक्षात घेऊन, आज आपण अशा चार चुकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंगच्या सवयींमधून काढून टाकल्या पाहिजेत.

कारच्या वायरिंगकडे लक्ष न देणे

कारची वायरिंग खूप नाजूक असते. जर वायरिंग योग्यरित्या केली नाही तर ती कापले जाऊ शकते, ज्यामुळे कारमध्ये शॉर्ट सर्किट होण्याचा धोका वाढतो. या शॉर्ट सर्किटमुळे कारमध्ये आग लागण्याची शक्यता वाढते. म्हणून, वायरिंगचे काम नेहमी अनुभवी मेकॅनिककडूनच करून घ्यावे.

इंजिन ओव्हरहिट होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे

उन्हाळ्यात, कारचे इंजिन इतर ऋतूंपेक्षा खूप वेगाने गरम होते. इंजिन जास्त गरम झाल्यामुळे, इंजिनच्या पार्ट्सना नुकसान होण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे आग देखील लागू शकते. म्हणून, कारचे रेडिएटर, कूलंट आणि फॅन नियमितपणे तपासा.

अ‍ॅक्सेसरीज आणि स्प्रेपासून दूर रहा

तुमच्या कारमध्ये जास्त परफ्यूम, डिओडोरंट स्प्रे किंवा कोणतेही गॅसयुक्त प्रॉडक्ट ठेवणे टाळा. खरंतर या गोष्टी ज्वलनशील असतात, ज्यामुळे कारला आग लागू शकते. यासोबतच, कारमध्ये स्वस्त किंवा लोकल अ‍ॅक्सेसरीज बसवणे टाळा, यामुळे कारला आग लागण्याची शक्यता देखील वाढते.

कारमध्ये प्लास्टिकच्या वस्तू ठेवू नका

कारमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या किंवा कोणत्याही ट्रान्सपरंट वस्तू ठेवणे टाळा. जर सूर्यप्रकाश त्यांच्यावर पडला तर लेन्सच्या परिणामामुळे आग लागू शकते. कारच्या सीटवर प्लास्टिक पॉलिथिन ठेवल्याने केबिनमध्ये उष्णता वाढू शकते, ज्यामुळे धोका वाढू शकतो. याशिवाय, कारमध्ये लायटर देखील ठेवू नये.

Web Title: Car care tips avoid these 4 mistakes otherwise your car will burn out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2025 | 05:39 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • car care tips

संबंधित बातम्या

नवीन वर्षात ग्राहकांना झटका! इलेक्ट्रिक स्कूटरसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे; जाणून घ्या किती होणार दरवाढ
1

नवीन वर्षात ग्राहकांना झटका! इलेक्ट्रिक स्कूटरसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे; जाणून घ्या किती होणार दरवाढ

New Year 2026: नव्या वर्षात दारू पिऊन चालवाल गाडी तर भरावे लागेल भरघोस चलान, आकडा वाचून चक्कर येईल
2

New Year 2026: नव्या वर्षात दारू पिऊन चालवाल गाडी तर भरावे लागेल भरघोस चलान, आकडा वाचून चक्कर येईल

Ferrari Car : पहिली Ferrari F80 ब्रिटनमध्ये दाखल; जगात फक्त तीनच कार, डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत वाचून हैराण व्हाल!
3

Ferrari Car : पहिली Ferrari F80 ब्रिटनमध्ये दाखल; जगात फक्त तीनच कार, डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत वाचून हैराण व्हाल!

MG EV Buy Back Program: एमजीचा बाजारात बोलबाला! इलेक्ट्रिक कार्सवर असा बायबॅक प्लान, ग्राहक आनंदाने हुरळले; खरेदीची लगबग
4

MG EV Buy Back Program: एमजीचा बाजारात बोलबाला! इलेक्ट्रिक कार्सवर असा बायबॅक प्लान, ग्राहक आनंदाने हुरळले; खरेदीची लगबग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.