
फोटो सौजन्य: Gemini
कमी रेंजची समस्या कोणत्याही कारमध्ये सामान्य असू शकते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे निष्काळजीपणा. इलेक्ट्रिक कार जास्त काळ चार्ज करण्यासाठी अनेकजण फास्ट चार्जिंगचा वापर करतात. यामुळे बॅटरीचे मोठे नुकसान होऊ शकते. याचा परिणाम कार चालवताना बॅटरीच्या परफॉर्मन्सवर होतो, परिणामी रेंज कमी होते.
नवीन वर्षात Mahindra XUV 7XO धुमाकूळ घालण्यास सज्ज! नवीन टिझर प्रदर्शित
Electric Car मधून जास्तीत जास्त Range मिळवायची असेल, तर सर्वात सोपा उपाय म्हणजे कार नेहमी ठराविक Speed मध्ये चालवणे. जर कारला खूप जास्त speed मध्ये चालवले, तर याची range वेगाने कमी होते. दीर्घकाळ असे वापरल्यास battery ला नुकसान पोहोचते आणि ती लवकर खराब होऊ लागते. यासोबतच motor वरही वाईट परिणाम होतो आणि त्यात बिघाड होण्याचा धोका वाढतो.
जर तुम्हीही इलेक्ट्रिक कार चालवत असाल आणि त्यातून चांगली रेंज मिळत असेल, तर कधीही कारच्या क्षमतेपेक्षा जास्त सामान घेऊन प्रवास करू नये. अनेकदा लोक आपल्या इलेक्ट्रिक कारमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक सामान ठेवतात. यामुळे कारची रेंज कमी होऊ लागते.
2 लाखांचं Down Payment आणि नवी कोरी Tata Sierra ची थेट होम डिलिव्हरी, जाणून घ्या EMI?
इलेक्ट्रिक कारमध्ये battery कधीही पूर्णपणे discharge होऊ देऊ नये. म्हणून बॅटरी 10 ते 20 टक्क्यांच्या दरम्यान राहिली की तिला charge करणे उत्तम असते. असे केल्याने battery ची रेंज टिकून राहते. मात्र, कारला खूप वारंवार चार्ज केल्यास बॅटरीला नुकसान होऊ शकते आणि रेंज कमी होण्यास सुरुवात होते.