फोटो सौजन्य: @Mahindra_XUV7X0/ X.com
भारतातील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेली महिंद्रा अनेक सेगमेंटमध्ये वाहने ऑफर करते. आता लवकरच कंपनीची नवीन एसयूव्ही, महिंद्रा XUV 7XO लाँच करणार आहे. महिंद्रा यांनी पहिल्यांदाच या एसयूव्हीच्या लाँचची सार्वजनिक घोषणा केली आहे. तसेच, सोशल मीडियावर कंपनीने एक टिझर रिलीज केला आहे.
Hello XUV 7XO: The new trendsetter is ready to build on the XUV700 legacy. World Premiere on 5th January, 2026. Watch this space for more updates. pic.twitter.com/7QLtiR2B2F — Mahindra XUV 7XO (@Mahindra_XUV7X0) December 8, 2025
2 लाखांचं Down Payment आणि नवी कोरी Tata Sierra ची थेट होम डिलिव्हरी, जाणून घ्या EMI?
महिंद्राने लवकरच त्यांची नवीन एसयूव्ही लाँच केली आहे. कंपनीने सोशल मीडियावर महिंद्र XUV 7XO चा पहिला व्हिडिओ टीझर रिलीज केला आहे, जो पुष्टी करतो की कंपनी लवकरच 7XO ही नवीन एसयूव्ही लाँच करेल. ही एसयूव्ही महिंद्राच्या विद्यमान XUV 700 ची अपडेटेड व्हर्जन असेल.
कंपनीने या एसयूव्हीचा 14 सेकंदाचा टीझर प्रदर्शित केला आहे. ज्यात एसयूव्हीच्या डिझाइनची काही झलक दिसते. माहितीनुसार, एसयूव्हीमध्ये L-आकाराचे एलईडी डीआरएल, प्रोजेक्टर हेडलाइट्स आणि एल-आकाराचे एलईडी टेललाइट्स असतील.
कंपनीने एसयूव्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स ऑफर केले आहे. त्यात प्रीमियम इंटीरियर, पॅनोरॅमिक सनरूफ, एडीएएस, हरमन ऑडिओ सिस्टम, ट्रिपल-स्क्रीन सेटअप, 360-डिग्री कॅमेरा, ईबीडीसह एबीएस, सहा एअरबॅग्ज आणि आयएसओफिक्स चाइल्ड अँकरेज यांचा समावेश असेल.
भारतात Harley Davidson X440T लाँच; मिळणार एकापेक्षा एक फाडू फीचर्स, जाणून घ्या किंमत
पेट्रोल आणि डिझेल इंजिन दोन्ही पर्यायांसह Mahindra XUV 7XO ऑफर केली जाण्याची अपेक्षा आहे. ही कार 2.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 2.2-लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन देऊ शकते. ही कार सहा-स्पीड मॅन्युअल आणि सहा-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह देखील देऊ शकते.
महिंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही एसयूव्ही 5 जानेवारी 2026 रोजी भारतात अधिकृतपणे लाँच केली जाईल.
महिंद्रा मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये XUV 7XO सादर करेल, जी MG Hector, Tata Sierra, Tata Safari, Kia Seltos, Hyundai Creta आणि Honda Elevate सारख्या कारशी स्पर्धा करेल.






