
मायलेज कमी होण्याची कारणे (फोटो सौजन्य - iStock)
गाडीचे मायलेज जास्त चांगले राहणे गरजेचे आहे कारण गाडी चांगली टिकण्यासाठी मायलेजची गरज भासते. तुम्हाला सतत पेट्रोल भरावे लागत असेल तर तुम्ही गाडी चालवताना काही चुका करत आहात आणि नक्की या चुका काय आहेत, याबाबत आपण जाणून घेऊया. यावर वेळीच तुम्ही उपाय करून मायलेज टिकवून ठेऊ शकता
जास्त RPM वर गाडी चालवणे
जेव्हा तुम्ही मॅन्युअल गाडीत चुकीच्या गिअरमध्ये गाडी चालवता, जसे की कमी गिअरमध्ये जास्त वेग किंवा जास्त गिअरमध्ये कमी वेग, तेव्हा त्यामुळे इंजिनवर ताण येतो आणि मायलेज खूपच कमी होतो. त्यामुळे ड्रायव्हरने RPM वर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. चुकीचा गिअर पडणार नाही याची काळजी घ्यावी. ही जबाबदारी ड्रायव्हरची आहे
EV मध्ये काय आहेत वैशिष्ट्ये, देशाच्या प्रगतीचे ठरणार पहिले चाक, PM Modi यांनी बांधले कौतुकाचे पूल!
एअर कंडिशनरचा जास्त वापर
जास्त वेळ एसी गाडीत चालू ठेवणे आणि तो देखील अत्यंत कमी तापमानावर हे चूक आहे आणि याशिवाय एसी चालू असताना पूर्ण वेगाने गाडी चालविल्यास मायलेज कमी होते. विशेषतः कमी वेगाने किंवा स्थिर कारमध्ये एसी चालवणेदेखील मायलेज खूप कमी करते. बरेचदा गाडी उभी करून एसी चालू ठेवला जातो. यापेक्षा जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी जास्त काळ थांबणार असाल तेव्हा खिडकी उघडा आणि बाहेरील हवा घ्या. एसी चालू ठेवणे टाळा
अनावश्यक भार आणि खराब देखभाल
गाडीतील जास्त वजन (छतावरील रॅक, ट्रंकमध्ये सामान) किंवा कमी टायर प्रेशर / जुने इंजिन ऑइल यामुळे मायलेज कमी होते. अनेकदा आपण गाडीची काळजी योग्य पद्धतीने घेत नाही आणि त्याचा परिणाम मायलेजवर होताना दिसतो. बरेचदा गाडीत अनावश्यक सामान भरलेले असते आणि तेच चूक ठरते
जास्त वेगाने गाडी चालवणे
महामार्गावर सतत १०० किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवल्याने इंजिनवर दबाव येतो आणि गाडीचे मायलेज कमी होते. अनेकदा आपण आजूबाजूला पाहतो की स्पीडचा विचार न करता भरधाव गाडी चालविण्यात येते. विशेषतः विविध महामार्गावर हा प्रकार अधिक दिसून येतो. त्यामुळे तुम्ही योग्य वेगात गाडी चालवणे अत्यंत गरजेचे आहे
भारतात कोणत्या कार्सवर किती आहे GST, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या कामाची गोष्ट