मारूतीच्या या 7 सीटर कारची अधिक मागणी (फोटो सौजन्य - iStock)
भारतात फॅमिली कार भरपूर आहेत, पण प्रत्येक कार एन्ट्री लेव्हलची नसते, उलट त्या खरेदी करण्यासाठी तुम्हाला खूप पैसे खर्च करावे लागू शकतात. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी व्हॅन घेऊन आलो आहोत ज्यामध्ये तुमचे संपूर्ण कुटुंब बसेल आणि तुमचे बहुतेक सामानही यामध्ये राहू शकते. एखादा प्लॅन तुम्ही करत असाल तर संपूर्ण कुटुंबाला तुम्ही घेऊन जाऊ शकता. जर तुम्हालाही या कारबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर हा लेख तुम्ही वाचाच.
खरंतर ही कार Maruti Eeco आहे जी पेट्रोल पर्यायात सुमारे 20 किलोमीटर प्रति लिटर आणि सीएनजीवर 27 किलोमीटर प्रति किलोग्रॅम मायलेज देते. ही एक किफायतशीर फॅमिली कार आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, ग्राहक ही कार 6.10 लाख रुपयांना खरेदी करू शकतात. रस्त्यावर आल्यावर, या कारमध्ये सुमारे 22,590 रुपये आरटीओ आणि 37,123 रुपये विमा रक्कम जोडली जाते (फोटो सौजन्य – iStock)
‘या’ कार कंपनीच्या नावे अनोखा रेकॉर्ड! 1 महिन्यात 24 लाखांपेक्षा अधिक गाड्यांचे केले सर्व्हिसिंग
मारूती इकोचे वैशिष्ट्य
ही मारुती व्हॅन पेट्रोल आणि सीएनजी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला १.२ लिटर पेट्रोल इंजिन मिळते, जे ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनच्या वैशिष्ट्यांसह उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की या व्हॅनचे पेट्रोल मॉडेल १९.७१ किमी/लीटर मायलेज देते आणि सीएनजी मॉडेल २६.७८ किमी/किलो पर्यंत मायलेज देते.
याशिवाय, या व्हॅनमध्ये तुम्हाला ६ एअरबॅग्ज, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्रंट पॉवर विंडो, मॅन्युअल एसी आणि रिक्लाइनिंग फ्रंट सीट्स तसेच ईबीडीसह एबीएस, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि सीट बेल्ट रिमाइंडर सारखी वैशिष्ट्ये देखील मिळतात.
सलमान खानने खरेदी केली करोडोंची बुलेटप्रूफ कार; गाडीत आहेत हे खास फिचर्स
Maruti Eeco फिचर्स
मारुती इको ही ५-सीटर आणि ७-सीटर मिनीव्हॅन आहे जी १.२-लिटर पेट्रोल इंजिनने चालते. ती ४ प्रकारांमध्ये आणि ५ रंगांमध्ये उपलब्ध आहे. इकोमध्ये ५-सीटर, ७-सीटर, कार्गो, टूर आणि Ambulance असे प्रकार आहेत.