Salman Khan Buy New Car Mercedes-benz Maybach Gls Spotted In Mumbai Outside Galaxy Apartment
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला विशेष ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. अभिनेता सर्वाधिक त्याच्या चित्रपटापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ओळखला जातो. अभिनेता सलमान खान याच्याकडे अनेक महाग आणि लक्झरियस कार्स आहेत. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला धमकी मिळाल्यानंतर आणि अभिनेत्याच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’वर फायरिंग झाल्यानंतर अभिनेत्याने त्याच्या ताफ्यामध्ये अनेक बुलेटप्रुफ कार खरेदी केल्या आहेत. Y+ सिक्युरिटीमध्ये राहणाऱ्या भाईजानने आता आणखी एक नवीन अलिशान कार खरेदी केली आहे.
काजोलच्या ‘Maa’ चित्रपटाला सेन्सॉरकडून मिळाला हिरवा सिग्नल, कोणत्याही कटशिवाय होणार प्रदर्शित
गेल्या काही दिवसांपूर्वीच सलमान खानने एक नवीन अलिशान बुलेटप्रुफ SUV कार खरेदी केली होती, जी कार त्याने दुबईवरुन खरेदी केलेली होती. अभिनेत्याच्या अलिशान कार कलेक्शनमध्ये मर्सिडिज बेंझ मेबॅक जीएलएस ही कार देखील आहे. अभिनेत्याने नुकतंच ही अलिशान कार खरेदी केली आहे. मर्सिडिज बेंझ मेबॅक जीएलएस या कारची मुंबईतील शोरूमची किंमत ३.३९ – ३.७१ कोटी रुपये आहे. बुलेटप्रूफ आर्मरिंगसह या लक्झरी कारची किंमत सहजपणे ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त जाते. ५ सीटर फुल साईज मर्सिडीजचे इंजिन ३९८२ सीसी आहे. तिचा टॉप स्पीड २५० किमी प्रतितास इतका आहे.
दरम्यान, भारतातील अनेक सेलिब्रिटींसह उद्योजकांकडे, क्रिकेटर्सकडे आणि राजकारणी नेत्यांकडे मेबॅक GLS600 ही कार आहे. परंतु सलमान खान अशी बुलेटप्रूफ कार असलेला कदाचित पहिलाच स्टार आहे. सलमान खान त्याच्या मेबॅक GLS600 या कारमध्ये दिसला. विरल भयानी ह्या पापाराझीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केले आहेत. सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये सलमान खान मर्सिडीज-मेबॅक GLS600 SUV च्या पुढच्या सीटवर बसलेला दिसतो. पोस्टमध्ये म्हटले आहे की ही त्याची नवीन मर्सिडीज-बेंझ GLS600 SUV आहे.
GLS600 हे GLS श्रेणीतील प्रमुख मॉडेल आहे, ज्यामध्ये लाउंज-शैलीतील सीटिंग, पॅनोरॅमिक सनरूफ, मागील-सीट मनोरंजन पॅकेज, कॉम्पॅक्ट रेफ्रिजरेटर, बर्मेस्टर ऑडिओ सिस्टम, व्हर्च्युअल असिस्टंट आणि बरेच काही समाविष्ट आहे. ही लक्झरी SUV 22-इंच अलॉय व्हील्सवर चालते, जी 23-इंच व्हील्समध्ये देखील अपग्रेड केली जाऊ शकते. मेबॅक GLS600 मधील इतर प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये अॅडॉप्टिव्ह एअर सस्पेंशन, ऑटोमॅटिक एक्सटेंडिंग साइड स्टेप्स, पॅनोरॅमिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा इत्यादींचा समावेश आहे. या लक्झरी एसयूव्हीला पॉवर देणारे 4.0-लिटर V8 टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे जे 550 bhp आणि 730 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 9-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे जे मर्सिडीजच्या 4Matic AWD सिस्टमद्वारे सर्व चार चाकांना पॉवर पाठवते. कामगिरीच्या बाबतीत, ते फक्त 4.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते आणि त्याचा टॉप स्पीड 250 किमी प्रतितास आहे.