
फोटो सौजन्य: @CitroenIndia/ X.com
मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनीने आपल्या लोकप्रिय Citroen Aircross X या एसयूव्हीच्या किमतीत वाढ केली आहे. या एसयूव्हीच्या किमतीत किती वाढ झाली आहे, कोणत्या व्हेरिएंट्सवर ही वाढ लागू झाली आहे? आता ही एसयूव्ही कोणत्या किमतीत उपलब्ध आहे? याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सिट्रॉएनकडून ऑफर करण्यात येणाऱ्या Aircross X एसयूव्हीच्या किमतीत अलीकडेच वाढ करण्यात आली आहे. मात्र, कंपनीकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे ही माहिती समोर आली आहे.
रिपोर्ट्सनुसार, या एसयूव्हीच्या किमतीत 45 हजार रुपये पर्यंत वाढ करण्यात आली आहे. मात्र, सर्व व्हेरिएंट्ससाठी ही वाढ समान नाही. वेगवेगळ्या व्हेरिएंट्सच्या किमतीत वेगवेगळी वाढ करण्यात आली असून, ही वाढ देशभरात तत्काळ लागू करण्यात आली आहे.
मॅन्युअल ट्रान्समिशनसह Turbo Max 7S Dual Tone, 7S, तसेच ऑटोमॅटिक Max 7S आणि Max 7S Dual Tone या व्हेरिएंट्सच्या किमतीत 45 हजार रुपये पर्यंत वाढ झाली आहे. याशिवाय, U5S, Plus 5S आणि Plus 7S या व्हेरिएंट्सच्या किमतीत सुमारे 20 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
Renault Duster 2026 करण्यात आली लाँच! renault ची आयकॉनिक डस्टर
कंपनीकडून अधिकृतरीत्या नवीन किंमत जाहीर करण्यात आलेली नसली तरी, वाढीनंतर Citroen Aircross X ची एक्स-शोरूम किंमत आता 8.49 लाख रुपये पासून सुरू होते. तर, या एसयूव्हीच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 14.14 लाख रुपये आहे.