
फोटो सौजन्य: Pinterest
भारतीय ऑटो बाजारात आपल्याला अनेक उत्तम एमपीव्ही पाहायला मिळतात. अशीच एक लोकप्रिय कार म्हणजे एमपीव्ही Kia Carens Clavis. जर तुम्हाला पेट्रोल इंजिनसह या MPV चा बेस व्हेरिएंट खरेदी करायचा असेल, तर 2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर सात वर्षांसाठी तुम्हाला दरमहा किती EMI भरावा लागेल? याबद्दल आपण जाणून घेऊयात.
फक्त 2 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर Maruti Suzuki ची ‘ही’ हॅचबॅक कार होईल तुमची; जाणून घ्या EMI
Kia MPV सेगमेंटमध्ये Carens Clavis ऑफर करते. याच्या पेट्रोल व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 11.08 लाख रुपये आहे. जर तुम्ही ही खरेदी केली, तर तुम्हाला 1.11 लाख रुपये नोंदणी शुल्क आणि विम्यासाठी 47,000 रुपये द्यावे लागतील. याव्यतिरिक्त, तुम्हाला TCS शुल्क म्हणून11,000 रुपये द्यावे लागतील, ज्यामुळे या कारची ऑन-रोड किंमत 12.83 लाख रुपये होईल.
जर तुम्ही Kia Carens Clavis चा पेट्रोल बेस व्हेरिएंट खरेदी केला, तर बँक एक्स-शोरूम किमतीवरच कर्ज दिले जाईल. अशा परिस्थितीत 2 लाख रुपयांचे Down Payment दिल्यानंतर सुमारे 10.83 लाख रुपये बँकेकडून कर्ज घ्यावे लागेल. जर बँक 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 10.83 लाख रुपयांचे कर्ज देत असेल, तर पुढील 7 वर्षांसाठी तुम्हाला दरमहा सुमारे 17435 रुपयांचा EMI भरावा लागेल.
9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 10.83 लाख रुपयांचा Car Loan घेतल्यास, दरमहा 17435 रुपये EMI सातत्याने भरावी लागेल. या कालावधीत एकूण सुमारे 3.80 लाख रुपये व्याजाच्या स्वरूपात द्यावे लागतील. त्यामुळे एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज मिळून Kia Carens Clavis पेट्रोल व्हेरिएंटची एकूण किंमत सुमारे 16.64 लाख रुपये इतकी होईल.
आता Tata Nexon EV दिसेल दोन नवीन कलर ऑप्शन्समध्ये! रेंजपासून ते फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही
Kia कडून Carens Clavis ला बजेट MPV सेगमेंटमध्ये सादर करण्यात आले आहे. या सेगमेंटमध्ये या कारची थेट स्पर्धा Renault Triber Kia Carens, Maruti Ertiga, आणि Toyota Innova Crysta सारख्या बजेट MPV मॉडेल्सशी होते. याशिवाय Mahindra Scorpio N, Mahindra XUV 700 आणि MG Hector अशा SUV मॉडेल्सकडूनही तिला चांगली टक्कर मिळते.