Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Citroen Basalt की Kia Sonet, किंमत, फीचर्स आणि इंजिनच्या बाबतीत कोणती SUV जास्त भारी?

भारतीय बाजारात एसयूव्ही सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर होत असतात. या सेगमेंटमध्ये Citroen Basalt आणि Kia Sonet ला चांगली मागणी मिळतेय. मात्र, कोणती कार बेस्ट? चला जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 18, 2025 | 09:54 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमधील स्पर्धा आता पूर्वीपेक्षा अधिक तीव्र होत चालली आहे. Citroen Basalt Coupe SUV ही थेट Kia Sonet ला टक्कर देत आहे. आकर्षक डिझाइन, दमदार इंजिन आणि आधुनिक फीचर्समुळे दोन्ही SUVs ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. मात्र, यापैकी एक SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी कोणती कार अधिक Value For Money ठरते, हे समजून घेणे महत्त्वाचे.

फीचर्समध्ये कोण पुढे?

Citroen Basalt मध्ये आराम आणि तंत्रज्ञानाचे उत्तम कॉम्बिनेशन पाहायला मिळते. यात मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तसेच आरामदायक सीट्स देण्यात आल्या आहेत. याशिवाय, मोठे बूट स्पेस कुटुंबीयांसोबतच्या प्रवासासाठी आणि लांबच्या जर्नीसाठी उपयुक्त ठरते. ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि रियर AC व्हेंट्समुळे ही SUV अधिक आरामदायक बनते.

2026 मध्ये Nissan Motors भारतात ‘ही’ 7 सीटर MPV कार ऑफर करणार

दुसरीकडे, Kia Sonet फीचर्सच्या बाबतीत आपल्या सेगमेंटमधील सर्वाधिक मजबूत SUVs पैकी एक मानली जाते. यात प्रीमियम साउंड सिस्टीम, वेंटिलेटेड सीट्स, सनरूफ, वायरलेस चार्जिंग आणि अनेक स्मार्ट टेक्नोलॉजी फीचर्स मिळतात. दैनंदिन वापरात हे फीचर्स Sonet ला अधिक प्रीमियम अनुभव देतात. त्यामुळे फीचर्सच्या बाबतीत Kia Sonet थोडीशी आघाडीवर दिसते.

इंजिन आणि ड्रायव्हिंग अनुभव

Citroen Basalt मध्ये पेट्रोल इंजिनचे 2 पर्याय उपलब्ध आहेत. इंजिन स्मूद ड्रायव्हिंग अनुभव देते आणि मायलेजही चांगले आहे. यातील सॉफ्ट सस्पेन्शनमुळे खराब रस्त्यांवरही प्रवास आरामदायक राहतो. Kia Sonet मात्र इंजिन पर्यायांच्या बाबतीत अधिक वैविध्य देते. यात पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन्ससह मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय मिळतात. जास्त पॉवर, चांगली परफॉर्मन्स आणि वेगवेगळ्या ड्रायव्हिंग स्टाइल्सची अपेक्षा असणाऱ्यांसाठी Sonet अधिक योग्य ठरते.

सेफ्टीमध्ये कोण जास्त मजबूत?

Citroen Basalt मध्ये 6 एअरबॅग्स, स्टॅबिलिटी कंट्रोलसह आवश्यक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत, जे गाडीला सुरक्षित बनवतात. तर Kia Sonet सेफ्टीच्या बाबतीत एक पाऊल पुढे आहे. यात ADAS, 360-डिग्री कॅमेरा आणि ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर यांसारखी अ‍ॅडव्हान्स सेफ्टी फीचर्स मिळतात, ज्यामुळे ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित होते.

जर्मनीत Rahul Gandhi यांना ‘या’ खास Rolls-Royce कारची भुरळ, भारतातील किंमत वाचून हडबडून जाल

किंमत आणि Value For Money

Citroen Basalt आणि Kia Sonet या दोन्ही SUVs ची किंमत जवळपास सारखीच आहे. वेगळा डिझाइन आणि आरामदायक ड्रायव्हिंग अनुभव हवा असेल, तर Basalt एक चांगला पर्याय ठरतो. मात्र, जास्त इंजिन पर्याय, भरपूर फीचर्स आणि प्रगत सेफ्टी टेक्नोलॉजीमुळे Kia Sonet ही SUV एकूणच अधिक व्हॅल्यू फॉर मनी ठरते.

Web Title: Citroen basalt vs kia sonet comparision between features price and engine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 09:54 PM

Topics:  

  • automobile
  • kia sonet
  • SUV

संबंधित बातम्या

2026 मध्ये Nissan Motors भारतात ‘ही’ 7 सीटर MPV कार ऑफर करणार
1

2026 मध्ये Nissan Motors भारतात ‘ही’ 7 सीटर MPV कार ऑफर करणार

जर्मनीत Rahul Gandhi यांना ‘या’ खास Rolls-Royce कारची भुरळ, भारतातील किंमत वाचून हडबडून जाल
2

जर्मनीत Rahul Gandhi यांना ‘या’ खास Rolls-Royce कारची भुरळ, भारतातील किंमत वाचून हडबडून जाल

‘या’ Car चा दरारा तर बघा! आतापर्यंत 35 लाख युनिट्सपेक्षा जास्त उत्पादन
3

‘या’ Car चा दरारा तर बघा! आतापर्यंत 35 लाख युनिट्सपेक्षा जास्त उत्पादन

सेफ्टी महत्वाची! ADAS टेक्नॉलॉजी असणाऱ्या ‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त कार
4

सेफ्टी महत्वाची! ADAS टेक्नॉलॉजी असणाऱ्या ‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.