फोटो सौजन्य: @INCIndia/ X.com
जर्मनीच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींचा एक नवीन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ते जगातील सर्वात आलिशान कारपैकी एक मानल्या जाणाऱ्या Rolls-Royce Phantom बारकाईने तपासणी करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ म्युनिकमधील बीएमडब्ल्यू मुख्यालयाच्या भेटीतील असल्याचे सांगितले जात आहे.
‘या’ Car चा दरारा तर बघा! आतापर्यंत 35 लाख युनिट्सपेक्षा जास्त उत्पादन
सध्या राहुल गांधी जर्मनी दौऱ्यावर आहेत, जिथे त्यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या एका कार्यक्रमात भाग घेतला होता. या दरम्यान त्यांनी बीएमडब्ल्यू मुख्यालयाला भेट दिली. यापूर्वी, BMW F450 GS या ॲडव्हेंचर बाईकची तपासणी करतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर दिसत होता. त्यात आता रोल्स-रॉइस फॅंटमसह त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
LoP Shri @RahulGandhi visited BMW World in Munich, Germany, and took a guided tour of BMW Welt and the BMW Plant. He was pleased to see TVS’s 450cc motorcycle, developed in partnership with BMW—a proud moment to witness Indian engineering on display. Manufacturing is the… pic.twitter.com/iqiMCAQD23 — Congress (@INCIndia) December 17, 2025
व्हायरल व्हिडिओमध्ये, राहुल गांधी फॅंटमच्या पुढच्या आणि मागच्या सीटचा अनुभव घेताना दिसत आहेत. ते कारची रचना, रंगाची गुणवत्ता आणि रोल्स-रॉइसच्या सिग्नेचर ‘Spirit of Ecstasy’ बोनेट ऑर्नामेंटचे देखील काळजीपूर्वक निरीक्षण करतात. व्हिडिओवरून हे स्पष्ट होते की ते कारची लक्झरी आणि कारागिरी खूप बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
देशभरात AI आधारित टोल कलेक्शन सिस्टम येणार? नितीन गडकरी यांनी सांगितला ‘फुलप्रूफ’ प्लॅन
भारतामध्ये Rolls-Royce Phantom ची एक्स-शोरूम सुरुवातीची किंमत सुमारे 9 कोटी रुपये आहे. जगातील सर्वात महागड्या आणि पूर्णपणे बेस्पोक लक्झरी कार्सपैकी एक म्हणून Phantom ओळखली जाते.
या कारचे मुख्य आकर्षण म्हणजे तिचे 6.75-लिटर ट्विन-टर्बो V12 इंजिन, जे सुमारे 563 hp पॉवर आणि 900 Nm टॉर्क निर्माण करते. आकाराने मोठी आणि वजनदार असूनही Phantom अतिशय स्मूद आणि शांतपणे धावते. याचे सस्पेन्शन सिस्टीम “मॅजिक कार्पेट राइड” सारखा अनुभव देते, ज्यामुळे खराब रस्त्यांवरील धक्केही आत बसलेल्या प्रवाशांना जाणवत नाहीत.






