2026 मध्ये Nissan Motors भारतात 'ही' 7 सीटर MPV कार ऑफर करणार
ग्रॅव्हाइट ही आधुनिक भारतीय कुटुंबांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली असून, किफायतशीर किंमत, प्रशस्त केबिन आणि बदल करता येणाऱ्या सीटिंग लेआउटसह येणार आहे. जुलै २०२४ मध्ये निसानने ज्या महत्त्वाकांक्षी उत्पादन मोहिमेची घोषणा केली होती, त्यातील ग्रॅव्हाइट हे दुसरे मॉडेल आहे. कंपनीनुसार, २०२६ च्या मध्यात निसान टेक्टॉन आणि २०२७ च्या सुरुवातीला एक नवीन ७-सीटर सी-एसयूव्ही भारतीय बाजारात सादर केली जाणार आहे.
मिनी कूपर घ्यायचा विचार करताय? भारतात सर्वांत स्वस्त कन्व्हर्टिबल ‘Mini Cooper S’ लॉन्च
ग्रॅव्हाइट हे नाव ‘ग्रॅव्हिटी’ या संकल्पनेपासून प्रेरित असून, संतुलन, स्थैर्य आणि मजबूत आकर्षण दर्शवते. भारतीय कुटुंबांना आराम, कार्यक्षमता आणि कनेक्टिव्हिटीचा समतोल अनुभव देण्याचा निसानचा दृष्टिकोन या नावातून व्यक्त होतो.
ग्रॅव्हाइटमध्ये निसानची सिग्नेचर C-आकाराची फ्रंट ग्रिल देण्यात आली असून, त्यामुळे रस्त्यावर कारची ठळक ओळख निर्माण होते. याशिवाय, खास हूड ब्रँडिंग आणि युनिक रिअर-डोअर बॅजिंगमुळे ती आपल्या सेगमेंटमध्ये वेगळी ठरणार आहे.
आतल्या बाजूस, प्रशस्त केबिन, अल्ट्रा-मॉड्यूलर सीटिंग आणि स्मार्ट स्टोरेज सोल्यूशन्स देण्यात येणार असून, दैनंदिन वापरासोबतच लांब प्रवासासाठीही ही एमपीव्ही उपयुक्त ठरेल.
ऑल-न्यू निसान ग्रॅव्हाइटचे उत्पादन रेनॉल्ट-निसानच्या चेन्नई येथील सुविधेत स्थानिक पातळीवर केले जाईल. यासोबतच, निसान देशभरात टियर-I आणि टियर-II शहरांमध्ये डीलर नेटवर्कचा वेगाने विस्तार करत आहे, ज्यामुळे ग्राहकांना खरेदी आणि सेवा अधिक सुलभ होणार आहे.
जर्मनीत Rahul Gandhi यांना ‘या’ खास Rolls-Royce कारची भुरळ, भारतातील किंमत वाचून हडबडून जाल
निसान एएमआयईओचे अध्यक्ष मॅसिमिलियानो मेसिना यांनी सांगितले की, भारत निसानसाठी उत्पादन आणि निर्यातीचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. तर, निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स यांच्या मते, ग्रॅव्हाइट ही भारतीय बाजारपेठेच्या बदलत्या गरजांचे प्रतीक असून, ब्रँडच्या परिवर्तनाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रॅव्हाइटच्या फीचर्सबाबत आणि किंमतीविषयी अधिक माहिती कंपनीकडून पुढील काळात जाहीर केली जाणार आहे.






