Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय डील आहे राव! फक्त 51000 रुपयात बुक करता येईल ‘ही’ 7 सीटर कार, Fortuner चे दिवस सरले

जर तुम्हीही एक चांगली 7 सीटर कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. याचे कारण म्हणजे तुम्ही एक उत्तम 7 सीटर कार फक्त 51000 रुपयात बुक करू शकता.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 04, 2026 | 09:52 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतात 7 सीटर कारला चांगली मागणी
  • Volkswagen Tayron फक्त 51000 रुपयात बुक करता येणार
  • जाणून घ्या या कारचे फीचर्स
भारतात आजही ग्राहक कार खरेदी करताना अशा पर्यायांच्या शोधात असतात जी त्यांच्या कटुंबासाठी एक योग्य असेल. यातही जर मोठे कुटुंब असेल तर मग अनेक जण 7 सीटर कार खरेदी करण्यास वळतात. अशातच जर तुम्ही देखील 7 सीटर कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे.

फोक्सवॅगन इंडियाने 2026 ची जोरदार सुरुवात केली आहे. कंपनीने भारतात त्यांची नवीन 7-सीटर प्रीमियम एसयूव्ही, Volkswagen Tayron R-Line साठी प्री-बुकिंग सुरू केली आहे. ग्राहक देशभरातील अधिकृत फोक्सवॅगन डीलरशिपवर किंवा कंपनीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे फक्त 51000 रुपयांचे टोकन रक्कम देऊन ही एसयूव्ही बुक करू शकतात. फोक्सवॅगन टायरॉन अधिकृतपणे फेब्रुवारी 2026 मध्ये लाँच केली जाईल.

भारतात स्थानिक पातळीवर असेंब्ली

फोक्सवॅगन टायरॉन भारतात स्थानिक असेंब्ली (CKD) द्वारे तयार केले जात आहे, ज्यामुळे त्याची किंमत लक्षणीयरीत्या नियंत्रणात राहील. त्याची सुरुवात सुमारे 45 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) होण्याची अपेक्षा आहे.

Mahindra Scorpio N Facelift ची टेस्टिंग सुरु! मात्र ‘हा’ खास फिचर कारमधून वगळला जाणार

लाँच झाल्यानंतर कोणाशी असेल स्पर्धा?

लाँच झाल्यानंतर, टायरॉन टोयोटा फॉर्च्युनर, स्कोडा कोडियाक, एमजी ग्लोस्टर, जीप मेरिडियन आणि आगामी एमजी मॅजेस्टी सारख्या प्रीमियम 7-सीटर एसयूव्हीशी स्पर्धा करेल.

R-लाइन डिझाइन : पहिल्याच नजरेत प्रभावशाली लूक

Volkswagen Tayron ही SUV फुली-लोडेड R-लाइन व्हेरिएंटमध्ये सादर केली जाणार असून, यामुळे तिला अधिक स्पोर्टी आणि प्रीमियम ओळख मिळते. डिझाइन हायलाइट्समध्ये सेगमेंट-फर्स्ट IQ लाइट्ससह HD मॅट्रिक्स LED हेडलॅम्प्स, आकर्षक R-लाइन बंपर आणि फ्रंट डोअरवर खास R-लाइन एलिमेंट्स देण्यात आले आहेत. याशिवाय 19-इंच कोव्हेंट्री अलॉय व्हील्स आणि पुढील व मागील बाजूस इल्यूमिनेटेड Volkswagen लोगो SUV च्या लूकला आणखी प्रीमियम बनवतात.

इंटीरियरमध्ये लक्झरी आणि अत्याधुनिक फीचर्स

Tayron R-Line चा केबिन लक्झरी आणि टेक्नॉलॉजीचा परफेक्ट संगम आहे. यात पॅनोरमिक सनरूफ, सेगमेंट-फर्स्ट 15-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच डिजिटल कॉकपिट, ऑगमेंटेड रिॲलिटी हेड-अप डिस्प्ले दिला आहे. पुढील सीट्स 12-वे इलेक्ट्रिक अ‍ॅडजस्टेबल असून त्यामध्ये मेमरी फंक्शन, वेंटिलेशन, मसाज आणि लंबर सपोर्टचा समावेश आहे. तसेच 30-कलर अँबियंट लाइटिंगमुळे केबिनमध्ये प्रीमियम फील मिळतो.

कार चालवताना मन प्रसन्न राहणार! Audi इंडियाने लाँच केले ‘माय ऑरास’ ॲप

सेफ्टी आणि ADAS मध्येही टॉप-क्लास पॅकेज

Volkswagen Tayron R-Line मध्ये सेफ्टीच्या दृष्टीने 9 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल असेंट आणि हिल डिसेंट कंट्रोलसह लेव्हल-2 ADAS चे 14 अ‍ॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्ट फीचर्स दिले आहेत. याशिवाय मल्टीपल ड्रायव्हर प्रोफाइल मोड्समुळे ड्रायव्हिंग अनुभव अधिक वैयक्तिकृत करता येतो.

पॉवरफुल इंजिन आणि AWD ची ताकद

या प्रीमियम SUV मध्ये 2.0-लीटर TSI EA888 evo4 टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले असून ते 204 PS पॉवर आणि 320 Nm टॉर्क निर्माण करते. यासोबत 7-स्पीड DSG ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि स्टँडर्ड 4MOTION AWD ड्राइव्ह सिस्टम दिली आहे. परफॉर्मन्सबाबत सांगायचे तर Tayron अवघ्या 7.3 सेकंदात 0 ते 100 kmph वेग गाठू शकते, तर तिची टॉप स्पीड 224 kmph (इलेक्ट्रॉनिकली लिमिटेड) आहे.

Web Title: 7 seater car volkswagen tayron can be booked for just rs 51000

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 09:52 PM

Topics:  

  • automobile
  • Toyota Fortuner
  • Volkswagen Taigun

संबंधित बातम्या

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!
1

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!
2

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!
3

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स
4

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.