
दुचाकी वाहनांसाठी प्रामुख्याने दोन प्रकारचे परवाने दिले जातात. गिअर नसलेल्या स्कूटर किंवा मोपेडसाठी 16 वर्षांवरील व्यक्तींना पालकांच्या संमतीने परवाना मिळू शकतो. तर गिअर असलेल्या मोटारसायकलींसाठी किमान वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे. या परवान्याद्वारे मोटारसायकल, स्कूटर आणि इतर दुचाकी वाहने चालवता येतात.
लाइट मोटार वाहन परवाना (LMV)
LMV अर्थात Light Motor Vehicle परवाना हा कार, जीप, व्हॅन, छोट्या मालवाहू वाहनांसाठी दिला जातो. यासाठी अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे. खासगी वाहनांसाठी हा सर्वाधिक वापरला जाणारा परवाना आहे. भारतातील बहुतेक चारचाकी वाहनचालकांकडे LMV लायसन्स असते.
जड मोटार वाहन परवाना (HMV)
HMV अर्थात Heavy Motor Vehicle परवाना ट्रक, बस, टँकर आणि मोठ्या व्यावसायिक वाहनांसाठी आवश्यक असतो. या परवान्यासाठी अर्जदाराचे वय साधारणपणे 20 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. तसेच वैध LMV परवाना आणि वाहन चालवण्याचा अनुभव आवश्यक असतो. व्यावसायिक वाहन चालकांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्रही गरजेचे असते.
परवाना मिळविण्याची प्रक्रिया
ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी सर्वप्रथम लर्निंग लायसन्स (Learner’s Licence) घ्यावे लागते. यासाठी वाहतूक नियम, रस्ते चिन्हे आणि सुरक्षित वाहनचालना यावरील ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष परीक्षा द्यावी लागते. लर्निंग लायसन्स मिळाल्यानंतर किमान 30 दिवसांनी कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करता येतो.
यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) ड्रायव्हिंग चाचणी घेतली जाते. वाहनावरील नियंत्रण, पार्किंग, रिव्हर्स ड्रायव्हिंग आणि वाहतूक नियमांचे पालन यांची तपासणी केली जाते. चाचणी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले जाते.
भारताच्या दुचाकी विश्वातील गाजलेलं नाव! जाणून घ्या ‘राजदूत’ची गोष्ट
आवश्यक कागदपत्रे