एकेकाळी भारताच्या रस्त्यांवर राज्य केलेली ही मोटरसायकल, आता मात्र रस्त्यांवारुन्ही आणि लोकांच्या मनातूनही कालबाह्य झालेली आहे. आजकाल जशी बुलेट, हंटर, हिमालयनची तरुणांमध्ये क्रेझ आहे तशीच काहीशी त्या काळी राजदूतची होती. विशेषकरून ग्रामीण भागात ही राजदूत बाईक खूप प्रसिद्ध होती, याचं कारण म्हणजे त्यांची खराब आणि कच्च्या रस्त्यांना सहन करण्याची शक्ती. आजही या गाडीला बऱ्याच लोकांकडून रीस्टोअर केलं जात. संग्रहासाठी किंवा विंटेज कलेक्शन साठी यांचं जतन केलं जात.
‘राजदूत’चा इतिहास
राजदूत मोटरसायकल भारतातील एक प्रतिष्ठित मोटरसायकल ब्रॅंड पैकी होती. आपल्या मजबूतपणासाठी आणि टिकाऊपणासाठी ही ओळखली जायची. विशेषतः ग्रामीण भागात या राजदूत मोटरसायकलची जास्त मागणी होती. असं म्हणतात कि राजदूत मोटरसायकल भारताच्या रस्त्यांवर राज्य करायची. 1948 मध्ये एस्कॉर्ट्स लिमिटेड कंपनीची स्थापना हर प्रसाद नंदा यांनी केली. 1960 मध्ये एस्कॉर्ट्स कंपनीने जर्मन कंपनी फोर्ड राईन कंपनीच्या बरोबर करार केला. याच्या नंतर 1962 मध्ये राजदूत नावाची पहिली मोटरसायकल लाँच केली गेली, जी फोर्ड राइन Taunus 175 ची भारतीय स्वरूप होती.
सॉलीड मायलेज, स्वस्त किंमत; ‘या’ बाईकचा जलवा
सामान्य माणसाची पसंती
राजदूत 175 भारतीय बाजारात वेगाने प्रसिद्ध झाली. याची मजबुती, इंधनाच्या हिशोबाने चांगले मायलेज या सर्वांनी सामान्य माणसाला राजदूतने भुरळ घातली. 1970 च्या दशकात राजदूत भारतीय मोटरसायकल बाजाराच्या 60% भागावर आपला दबदबा बनवून होती. राजदूत 175,250,350 आणि 500 cc सहित बऱ्याच मॉडलचे उत्पादन कंपनीतर्फे करण्यात आले. या राजदूत मोटरसायकलचा उपयोग प्रकर्षाने पोलीस, सैन्य आणि सरकारी विभागात केला जायचा.
गेली अनेक दशके गाजवलेल्या ‘या’ बाईक्स आजही तरुणांना प्रेमात पाडतात
कोणकोणते मॉडल होते सर्वात लोकप्रिय
राजदूत 175 सगळ्यात लोकप्रिय झालेलं मॉडल होतं, जे 1962 ते 1985 च्या दरम्यान उत्पादित केलं गेलं होत. राजदूत 250,1970 च्या दशकात लाँच केलेलं सर्वात पावरफुल मॉडल मानलं जायचं. राजदूत 350 भारतात तयार केलेली पहिली वहिली डिस्क ब्रेक वाली मोटरसायकल होती.






