Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टेस्लाच्या नव्या ‘फ्लाइंग कार रोडस्टर’साठी भारतात बुकिंग सुरू! फक्त बुकिंगसाठीच लागणार 2.50 ते 3 कोटी रुपये! जाणून घ्या डिटेल्स

टेस्लाच्या नव्या रोडस्टरसाठी भारतात बुकिंग सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. परफॉर्मन्स व्हेरिएंटसाठी सुमारे 50.06 लाख रुपये रिजर्वेशन साठी भरावे लागणार आहेत. 1,341 हॉर्सपॉवरची पॉवर आणि ‘फ्लाइंग कार’ची चर्चा असली, तरी ही कार प्रत्यक्षात किती उडू शकते? पाहूयात

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 17, 2026 | 07:59 PM
टेस्लाच्या नव्या ‘फ्लाइंग कार रोडस्टर’साठी भारतात बुकिंग सुरू! फक्त बुकिंगसाठीच लागणार 2.50 ते 3 कोटी रुपये! जाणून घ्या डिटेल्स
Follow Us
Follow Us:
  • टेस्ला रोडस्टरसाठी भारतात बुकिंग सुरू झाल्याची माहिती; परफॉर्मन्स व्हेरिएंटच्या आरक्षणासाठी 50.06 लाख रुपये लागतील.
  • रॉकेट व्हेरिएंटचा लक्ष्यित कमाल वेग 370 किमी/तासापेक्षा जास्त; पण सतत हवेत उडण्याची क्षमता अद्याप सिद्ध झालेली नाही.
  • रोडस्टरचे प्रोडक्शन 2028 मध्ये अपेक्षित; भारतासाठी अंतिम किंमत आणि डिलिव्हरीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
टेस्लाने आपल्या नव्या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार रोडस्टरसाठी भारतात बुकिंग सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. या कारच्या परफॉर्मन्स व्हेरिएंटसाठी फक्त बुकिंगचीच एकूण किंमत सुमारे 50.06 लाख रुपये आहे. पण ही कारची टोटल शेवटची किंमत नसून रिजर्वेशनसाठी द्यावी लागणारी रक्कम आहे. कंपनीने या कारचे प्रोडक्शन 2028 मध्ये सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या दाखवण्यात आलेली कार ही प्रोडक्शनच्या जवळ जाणारी प्रोटोटाइप मॉडेल आहे. भारतातील डिलिव्हरीची तारीख आणि अंतिम किंमत अद्याप जाहीर झालेली नाही.

विमानासारखी डिझाइन आणि दमदार इलेक्ट्रिक पॉवर

नव्या टेस्ला रोडस्टरच्या डिझाइनमध्ये SR-71 आणि F-35 या विमानांपासून प्रेरणा घेतल्याचे सांगितले जाते. यात लपवलेले हेडलॅम्प, काढता येणारे काचेचे रूफ पॅनल आणि रिअर विंग देण्यात आले आहेत. हे विंग एअरब्रेक म्हणूनही काम करते. केबिनमध्ये योक-स्टाइल स्टिअरिंग, ड्रायव्हरसमोर टचस्क्रीन आणि हाताने कंट्रोल करता येणारे पेडल्स आहेत.

या प्रोटोटाइपमध्ये मागील एक्सलवर 2 इलेक्ट्रिक मोटर्स असून त्या मागच्या चाकांना पॉवर देतात. त्यांची एकत्रित पॉवर 1 मेगावॅट म्हणजेच सुमारे 1,341 हॉर्सपॉवर असल्याचा दावा आहे. 4680 सेल बॅटरीच्या मदतीने 483 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज मिळवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. 10 ते 80 टक्के चार्जिंगसाठी 10 ते 12 मिनिटांचा अंदाजही देण्यात आला आहे. पण हे आकडे लास्ट प्रोडक्शन मॉडेलचे प्रमाणित रिझल्ट समजू नयेत.

टेस्लाची उडणारी कार पाहून जग थक्क! इलॉन मस्कच्या ‘रोडस्टर’ फ्लाइंग कारचा जलवा! १ सेकंदात गाठणार १०० किलोमीटर

3 व्हेरिएंट्स; ‘रॉकेट’ मॉडेलचा वेग थक्क करणारा!

टेस्ला रोडस्टरमध्ये परफॉर्मन्स, थ्रस्ट आणि रॉकेट असे 3 कॉन्फिगरेशन सांगण्यात आले आहेत. परफॉर्मन्स व्हेरिएंट 0 ते 96 किमी/तास वेग 1.6 सेकंदांपेक्षा कमी वेळेत गाठण्याचे लक्ष्य ठेवतो. यात कारच्या खालून हवा खेचून डाउनफोर्स निर्माण करणारे 4 फॅन्स आहेत. थ्रस्ट व्हेरिएंटमध्ये नायट्रोजन थ्रस्टर्स देण्यात आले असून, 0 ते 96 किमी/तास वेग 0.9 सेकंदांपेक्षा कमी वेळेत गाठण्याचा दावा आहे. रॉकेट हा सिंगल-सीटर असून त्यात एकूण 10 थ्रस्टर्स आहेत. त्यासाठी 0 ते 96 किमी/तास वेग 0.59 सेकंदांपेक्षा कमी आणि कमाल वेग 370 किमी/तासापेक्षा जास्त असल्याचे लक्ष्य सांगितले आहे.

पण ‘फ्लाइंग कार’ हे नाव ऐकून ती प्रत्यक्ष विमानासारखी उडू शकते, असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. टेक्सासमधील प्रक्टिकल प्रोटोटाइपने स्लोपवरून वर जाण्याचा आणि क्षणभर जमिनीपासून वर उठण्याचा प्रयोग केला. यावरून सतत हवेत उडण्याची क्षमता सिद्ध होत नाही.या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार रॉकेट व्हेरिएंटला सार्वजनिक रस्त्यांवर वापरण्याचीही मंजुरी नसल्याचे अहवालात नमूद आहे.

भारतात बुकिंगसाठी किती पैसे द्यावे लागतील?

भारतात परफॉर्मन्स व्हेरिएंटसाठी सुरुवातीला 5.01 लाख रुपये आणि त्यानंतर 10 दिवसांच्या आत 45.05 लाख रुपये भरावे लागतील, अशी माहिती देण्यात आली आहे. थ्रस्टसाठी सुरुवातीची रक्कम 5.01 लाख रुपये आणि पुढील पेमेंट 2.45 कोटी रुपये असल्याचे दिलेल्या वृत्तात नमूद आहे. त्यामुळे बुकिंगची एकूण रक्कम अनुक्रमे सुमारे 50.06 लाख आणि 2.50 कोटी रुपये होते. पहिली रक्कम परत मिळू शकत असल्याचे सांगितले आहे; पण चेंजेससाठी केलेली काही पेमेंट्स परत मिळणार नाहीत. रॉकेट व्हेरिएंटसाठी इन्वीटेशन आवश्यक असून, त्याची अवेलेबलीटी लिमिटेड आहे.

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

💡 Frequently Asked Questions

1. टेस्ला रोडस्टरची भारतात बुकिंग रक्कम किती आहे?

दिलेल्या वृत्तानुसार, परफॉर्मन्स व्हेरिएंटसाठी एकूण आरक्षणाची रक्कम सुमारे 50.06 लाख रुपये आहे. ही अंतिम कारची किंमत नाही.

2. टेस्ला रोडस्टर भारतात कधी लाँच होणार आहे?

कंपनीने प्रोडक्शन 2028 मध्ये सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पण भारतातील लाँच आणि डिलिव्हरीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

3. टेस्ला रोडस्टर ही खरोखर उडणारी कार आहे का?

सध्या उपलब्ध माहितीनुसार, प्रोटोटाइपच्या प्रात्यक्षिकातून सतत हवेत उडण्याची क्षमता सिद्ध झालेली नाही. त्यामुळे तिला प्रत्यक्ष विमानाप्रमाणे उडणारी कार म्हणणे योग्य ठरणार नाही.

Web Title: Tesla roadster flying car bookings open india auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 07:57 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Tesla
  • world

संबंधित बातम्या

मारुती सुझुकीने भारतात विकल्या 65 लाखांहून जास्त जुन्या कार! ‘ट्रू व्हॅल्यू’ स्कीमचा जंगी विक्रम!
1

मारुती सुझुकीने भारतात विकल्या 65 लाखांहून जास्त जुन्या कार! ‘ट्रू व्हॅल्यू’ स्कीमचा जंगी विक्रम!

हिरो विडाची Dirt.e K3 6Days लिमिटेड एडिशन सादर! जगभरात फक्त 100 युनिट्स होणार उपलब्ध!
2

हिरो विडाची Dirt.e K3 6Days लिमिटेड एडिशन सादर! जगभरात फक्त 100 युनिट्स होणार उपलब्ध!

ह्युंदाई क्रेटाची भारतात 15 लाखांहून जास्त विक्री! मिडसाइज SUV सेगमेंटमध्ये दबदबा कायम
3

ह्युंदाई क्रेटाची भारतात 15 लाखांहून जास्त विक्री! मिडसाइज SUV सेगमेंटमध्ये दबदबा कायम

नवी ऑडी Q3 भारतात लाँच! किंमत 51.99 लाख रुपये, 201 hp इंजिनसह मिळणार भन्नाट फीचर्स
4

नवी ऑडी Q3 भारतात लाँच! किंमत 51.99 लाख रुपये, 201 hp इंजिनसह मिळणार भन्नाट फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.