Jawa Yezdi ची 'ही' लोकप्रिय बाईक आता Amazon आणि Flipkart वर उपलब्ध
सणासुदीच्या काळात मागील वर्षी विक्रीचे विक्रम नोंदवणाऱ्या या लोकप्रिय बाईक्सना आता ऑनलाइन माध्यमातून अधिक व्यापक पोहोच मिळणार आहे. यामुळे क्लासिक दमदार रायडींगवर प्रेम करणाऱ्या रायडर्ससाठी खरेदी प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
Nissan Tekton लाँच होण्यापूर्वी सोशल मीडियावर नवी टिझर झाला रिलीज, मिळाली ‘ही’ माहिती
जावा येझ्दी मोटरसायकल्सने आपल्या यशस्वी ऑनलाइन पदार्पणानंतर डिजिटल वितरण क्षमता अधिक मजबूत केली आहे. Flipkart वर प्रीमियम क्लासिक मोटरसायकल्स सूचीबद्ध करणारी जावा येझ्दी ही पहिली कंपनी ठरली होती. त्यानंतर Amazon वरही ही सेवा सुरू करण्यात आली. कंपनीचे ऑनलाइन मॉडेल हे डीलर-आधारित असून, यामुळे ग्राहकांना ऑनलाइन बुकिंगनंतर स्थानिक डीलरकडून संपूर्ण ऑन-रोड प्रक्रिया पूर्ण करता येते.
जावा येझ्दी मोटरसायकल्सचे सह-संस्थापक अनुपम थरेजा म्हणाले, “Amazon आणि Flipkart वर 2025 Yezdi Adventure आणि Roadster उपलब्ध करून दिल्यामुळे देशभरातील रायडर्सना क्लासिक मोटरसायकलिंगचा अनुभव अधिक सहज घेता येणार आहे. या बाइक्सना शोरूममध्ये मिळालेला प्रतिसाद हा परंपरा आणि आधुनिक अभियांत्रिकी यांचा मिलाफ किती लोकप्रिय आहे, याचे प्रतीक आहे.”
ग्राहक Amazon किंवा Flipkart वर एक्स-शोरूम बुकिंग रक्कम भरू शकतात. त्यानंतर स्थानिक अधिकृत डीलर ऑर्डरची पुष्टी करून उर्वरित ऑन-रोड पेमेंट, नोंदणी आणि विम्याची प्रक्रिया पूर्ण करतो. ॲक्सेसरीज आणि ॲड-ऑन्सची खरेदी डीलरशिपवर केली जाईल.
Amazon वर ग्राहकांना 6,500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक, Prime मेंबर्ससाठी 5% कॅशबॅक आणि 6 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI चा लाभ मिळणार आहे. तर Flipkart वर ₹10,000 पर्यंत बँक ऑफर्स आणि ₹4,000 पर्यंत क्रेडिट कार्ड कॅशबॅक देण्यात येणार आहे.
2025 Yezdi Adventure आणि 2025 Yezdi Roadster व्यतिरिक्त Jawa 350, Jawa 42, 42 FJ, 42 Bobber आणि Perak ही संपूर्ण जावा रेंजही या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. सध्या ही सेवा देशातील 44 शहरांमध्ये 55 अधिकृत डीलर्समार्फत सुरू असून, महाराष्ट्रात पुण्यासह अनेक प्रमुख शहरांचा त्यात समावेश आहे.






