Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ही’ तर दिलदार कंपनी! कारची किंमत 5 लाख देखील नाही आणि त्यात मिळतंय 65000 रुपयांचे डिस्काउंट; नवीन किंमत…

Citroen India ने त्यांच्या कार्सवर मार्च महिन्यात आकर्षक डिस्काउंट जाहीर केल्यात आहेत. या ऑफरमुळे सिट्रोएन C3 कार अधिक स्वस्त झाली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 20, 2026 | 09:52 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • Citroen ने जाहीर केल्या दमदार ऑफर
  • सिट्रोएन C3 कार अजूनच झाली स्वस्त
  • जाणून घ्या या कारबद्दल
सिट्रोएन इंडियाने मार्च महिन्यासाठी त्यांच्या कार्स सवलतींची घोषणा केली आहे. यामध्ये त्यांच्या ‘एन्ट्री-लेव्हल’ मॉडेलचा, म्हणजेच ‘सिट्रोएन C3‘ चाही समावेश आहे. ही कंपनी या हॅचबॅक कारवर 65000 रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स देत आहे. या ऑफरअंतर्गत उपलब्ध होणारे लाभ हे विशिष्ट मॉडेल, व्हेरिएंट आणि ठिकाणानुसार वेगवेगळे असतील. या योजनांमध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि फायनान्सिंगच्या विशेष ऑफर्सचा समावेश आहे.

भारतात या ब्रँडचे एन्ट्री-लेव्हल वाहन म्हणून ओळखली जाणारी C3, परवडणारी आणि शहरात वापरण्यास अत्यंत सोयीस्कर अशी कार शोधणाऱ्या ग्राहकांना आजही मोठ्या प्रमाणावर आकर्षित करत आहे. विशेष म्हणजे, C3 ची सुरुवातीची ‘एक्स-शोरूम’ किंमत 4.99 लाख रुपये इतकी आहे.

शरीर म्हणेल थांब पण बाईक चालतच राहील लांब! फुल टॅंकवर 900 किमीची रेंज देतात ‘या’ Bikes, किंमत…

Citroen C3X चे टॉप फीचर्स

Citroen C3X मध्ये स्टँडर्ड C3 च्या तुलनेत 15 नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत. यात प्रॉक्सिमिटी-सेंस पॅसिव एंट्री आणि पुश स्टार्ट, की-लेस एंट्री/स्टार्ट, क्रूज कंट्रोल आणि स्पीड लिमिटर, 6 एअरबॅग्स, HALO 360 डिग्री कॅमेरा सिस्टम, LED व्हिजन प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, LED DRLs आणि LED फॉग लॅम्प्स यांचा समावेश आहे.

याशिवाय 10.25-इंच टचस्क्रीन, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, तसेच ट्रॉपिकलाइज्ड ऑटोमॅटिक AC हे फीचर्स मिळतात. 315 लिटर बूट स्पेस आणि रिअर USB टाइप-C चार्जिंग सिस्टमही देण्यात आली आहे. भारतात या SUV ची स्पर्धा Nissan Magnite, Tata Punch, Hyundai Exter तसेच Maruti WagonR आणि Maruti Swift यांच्याशी होते.

C3X चे इंजिन आणि मायलेज

C3X SUV दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. पहिला 1.2 लिटर नॅचरल्ली अस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असून ते 82hp पॉवर देते आणि 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत येते. दुसरा 1.2 लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन असून ते 110hp पॉवर देते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससोबत उपलब्ध आहे.

कंपनीनुसार या कारचे ARAI मायलेज 18.30 kmpl आहे. मात्र रिअल-वर्ल्ड टेस्टमध्ये टर्बो ऑटोमॅटिक व्हेरिएंटने शहरात 8.46 kmpl आणि हायवेवर 13.38 kmpl मायलेज दिले, तर सरासरी मायलेज 10.92 kmpl राहिले.

या 1.2 लिटर टर्बो इंजिनमधून 110hp पॉवर आणि 205Nm टॉर्क मिळतो. याचे थ्रॉटल कॅलिब्रेशन आक्रमक असल्यामुळे कार जलद आणि रिस्पॉन्सिव वाटते. त्यामुळे वेगात ड्रायव्हिंग आणि ओव्हरटेकिंग आवडणाऱ्यांसाठी ही कार योग्य ठरते. मात्र, याच कारणामुळे प्रत्यक्ष वापरात मायलेज थोडे कमी मिळते.

Web Title: Discount on citroen cars in march 2026 citroen c3 became more affordable

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 09:49 PM

Topics:  

  • automobile
  • Citroen C3
  • Discount Offer

संबंधित बातम्या

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!
1

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!
2

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!
3

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स
4

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.