Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांनो ही बातमी तुमच्यासाठी! लवकरच सुरु होणार e-Bike Taxi सर्व्हिस, भाडं वडापावच्या किमतीपेक्षाही कमी

आता मुंबईकरांना लवकरच परवडणाऱ्या, जलद आणि पर्यावरणपूरक राईड्सचा आनंद घेता येणार आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडी आणि खर्चही कमी होईल. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 19, 2025 | 08:09 PM
मुंबईत लवकरच सुरु होणार e-Bike Taxi सर्व्हिस (फोटो सौजन्य: iStock)

मुंबईत लवकरच सुरु होणार e-Bike Taxi सर्व्हिस (फोटो सौजन्य: iStock)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई म्हणजे संपूर्ण देशाचं हृदयच. फक्त महाराष्ट्रातून नाही तर संपूर्ण देशातून कित्येक जण आपले स्वप्न घेऊन या मायानगरीत येत असतात. यामुळेच तर या शहरात झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. परिणामी लोकलमध्ये गर्दी, मेट्रोमध्ये गर्दी आणि रस्त्यावरून चालताना देखील गर्दीचा सामना करावा लागत आहे. त्यात, विविध विकास कामांमुळे देखील मुंबईत ट्राफिक जाम होत असते. मात्र, आता मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे.

राज्य सरकारने घोषणा केली आहे की या महिन्याच्या अखेरीस मुंबईत ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू होतील. प्रवाशांना परवडणारी, पर्यावरणपूरक आणि फास्ट प्रवास प्रदान करणे हे यामागील उद्दिष्ट आहे. ही सेवा Ola, Uber आणि Rapido संयुक्तपणे चालवतील.

किती असेल भाडं?

सरकारने ई-बाईक टॅक्सीचे भाडे अतिशय परवडणारे ठेवले आहे. पहिल्या 1.5 किलोमीटरचे भाडे 15 रुपये निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर, प्रवाशांना प्रत्येक अतिरिक्त किलोमीटरसाठी फक्त 10.27 रुपये द्यावे लागतील. हे भाडे ऑटो-रिक्षा आणि टॅक्सींपेक्षा खूपच स्वस्त आहे. दररोज प्रवास करणारे, ऑफिसमध्ये जाणारे आणि सामान्य जनतेला याचा थेट फायदा होईल.

Learning License काढणाऱ्यांनो लक्ष द्या! ‘ही’ महत्वाची सेवा तात्पुरती स्थगित करण्यासाठी परिवहन विभागाचे NIC ला पत्र

कोणत्या कंपन्यांना परवानगी मिळाली?

सध्या, ओला, उबर आणि रॅपिडो या तीन कंपन्यांना ई-बाईक टॅक्सी सेवा चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. या कंपन्यांना तात्पुरते परवाने मिळाले आहेत आणि त्यांना पुढील 30 दिवसांत कायमस्वरूपी परवाने मिळवावे लागतील. त्यानंतर, मुंबईत ही सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल.

नियम आणि अटी

ही नवीन सेवा सुरक्षित आणि विश्वासार्ह असावी यासाठी सरकारने काही नियम निश्चित केले आहेत. प्रत्येक कंपनीकडे किमान 50 ई-बाईक असणे आवश्यक आहे. रायडर्स 20 ते 50 वर्षांच्या दरम्यान असले पाहिजेत आणि त्यांच्याकडे व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. सर्व ई-बाईक टॅक्सी पिवळ्या रंगाच्या असतील आणि त्यांचा कमाल वेग ताशी 60 किमी निश्चित करण्यात आला आहे. रायडर्सना दोन पिवळे हेल्मेट बाळगावे लागतील. 12 वर्षांखालील मुलांना ही सेवा वापरण्याची परवानगी राहणार नाही. महिलांच्या सुरक्षिततेसाठी, महिला रायडरचा पर्याय देखील उपलब्ध असेल.

नवीन GST दरांच्या नावानं चांगभलं! ‘या’ 5 Compact SUV ची किंमत 1.50 लाख रुपयांनी स्वस्त

मुंबईकरांना कसा होणार फायदा?

ई-बाईक टॅक्सी सर्व्हिसमुळे मुंबईतील लोकांना अनेक फायदे मिळेल. सर्वात मोठा फायदा म्हणजे वाहतूक कोंडीपासून सुटका, कारण ई-बाईक सहजपणे गर्दीच्या रस्त्यांवर प्रवास करू शकतात. आणखी एक फायदा म्हणजे कमी भाडे, ज्यामुळे दैनंदिन प्रवाशांचा खर्च कमी होईल. तिसरा फायदा म्हणजे प्रदूषण कमी होणे, कारण इलेक्ट्रिक बाइक्स धूर सोडत नाहीत.

Web Title: E bike taxi service will be soon open in mumbai know the fare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 08:09 PM

Topics:  

  • e bike taxi
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai Climate Week 2026 : नागरिकांना ‘अग्नि रक्षक’ प्रशिक्षण; शहराची अग्नी आपत्कालीन सज्जता होणार  मजबूत
1

Mumbai Climate Week 2026 : नागरिकांना ‘अग्नि रक्षक’ प्रशिक्षण; शहराची अग्नी आपत्कालीन सज्जता होणार  मजबूत

बचावलेल्या बिबट्यांची तपासणी बंधनकारक! वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या वन मंत्री गणेश नाईकांच्या सूचना
2

बचावलेल्या बिबट्यांची तपासणी बंधनकारक! वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या वन मंत्री गणेश नाईकांच्या सूचना

झोपडीधारकांना मध्य रेल्वेची नोटिस, लवकच राबविण्यात येणार अतिक्रमण हटाव मोहीम! जाणून घ्या सविस्तर
3

झोपडीधारकांना मध्य रेल्वेची नोटिस, लवकच राबविण्यात येणार अतिक्रमण हटाव मोहीम! जाणून घ्या सविस्तर

ज्येष्ठांसाठी ‘लालपरी’ ठरतीये फायद्याची; तब्बल पावणेदोन लाख जणांनी केला मोफत प्रवास
4

ज्येष्ठांसाठी ‘लालपरी’ ठरतीये फायद्याची; तब्बल पावणेदोन लाख जणांनी केला मोफत प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.