फोटो सौजन्य: Gemini
भारतात पाच सीट्ससह अनेक दमदार मिड साईज SUV उपलब्ध आहेत. मागील महिन्यात म्हणजेच जानेवारी 2026 मध्ये या सेगमेंटमध्ये कोणत्या पाच SUV ला सर्वाधिक मागणी मिळाली, याची माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. टॉप 5 मध्ये कोणत्या कार्सचा समावेश झाला आहे, ते जाणून घेऊया.
कशी असू शकते Honda Activa 2026? जाणून घ्या इंजिनपासून ते किमतीपर्यंची A टू Z माहिती
ह्युंदाई क्रेटा मिड साईज SUV सेगमेंटमध्ये कायमच लोकप्रिय ठरली आहे. मागील महिन्यात या SUV च्या 17,921 युनिट्सची विक्री झाली. यापूर्वी तिची 18,522 युनिट्स विक्री झाली होती. वर्षानुवर्षांच्या तुलनेत (YoY) विक्रीत सुमारे 3 टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे.
मारुतीने काही महिन्यांपूर्वी बाजारात सादर केलेली विक्टोरिस SUV ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळवत आहे. मागील महिन्यात या मॉडेलच्या 15,240 युनिट्सची विक्री झाली आहे, ज्यामुळे ती दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
कियाने नुकतीच सेल्टॉसची नवी जनरेशन बाजारात आणली आहे. जानेवारी महिन्यात या SUV च्या 10,639 युनिट्सची देशभरात विक्री झाली. यापूर्वी जानेवारी 2025 मध्ये जुन्या जनरेशनच्या 6,470 युनिट्स विकल्या गेल्या होत्या. यामुळे वर्षानुवर्षांच्या तुलनेत 64 टक्क्यांची लक्षणीय वाढ दिसून आली आहे.
एकदा चार्ज करा आणि मग कार सुसाट! ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त Electric Car, किंमत…
टोयोटाची हायरीडरही पाच सीट्ससह मिड साईज SUV सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. मागील महिन्यात या SUV च्या 9,156 युनिट्सची विक्री झाली. जानेवारी 2025 मध्ये ही संख्या 4,941 युनिट्स इतकी होती, म्हणजेच विक्रीत चांगली वाढ झाली आहे.
मारुतीची ग्रँड विटारा देखील या सेगमेंटमध्ये मजबूत स्पर्धक ठरली आहे. मागील महिन्यात या SUV च्या 7,030 युनिट्सची विक्री झाली. मात्र जानेवारी 2025 मध्ये तिची 15,784 युनिट्स विक्री झाली होती.






